'या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसांना 7.5 लाखांची मदत, अजित पवारांनी घेतला निर्णय
अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान तथा वाहन चालक कैलास गेणू कसबे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.तसेच भविष्यात अशा प्रकरणांमध्ये सत्वर मदत होण्याच्या दृष्टीने गृह विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरुपी धोरण तात्काळ करण्याचे निदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती, उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी दिली.
नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्र.१ मधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यावर ७ जुलै २०२४ रोजी रात्री कारवाई केली होती. अवैध मद्यविक्री करणाऱ्या आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करीत असताना राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या भरारी पथकाच्या वाहनाला आरोपींच्या वाहनाने धडक दिली व त्यामध्ये जवान तथा वाहनचालक कैलास गेणू कसबे यांचा मृत्यू झाला होता.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या खात्याचा कार्यभार घेताच या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सन २०१४ मध्ये गृह विभागाने केलेल्या मदतीच्या धर्तीवर (पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय ठरल्याप्रमाणे साडेसात लाख रुपये) राज्य उत्पादन शुल्क विभागातील दिवंगत जवान कैलास कसबे यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून ७.५० रुपये लाख नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
अवैध मद्यसाठा घेऊन वेगाने जाणार्या अज्ञात वाहनाचा पाठलाग करतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सरकारी वाहन उलटले. यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा १ कर्मचारी जागीच ठार झाला, तर दोन पोलीस घायाळ झाले आहेत. यावेळी ‘‘संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाला विभागाकडून साहाय्य देऊ.’’, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, असं म्हटलं होते. याचप्रकरणी आता उपमुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातहून नाशिककडे मद्यसाठा नेणार्या वाहनाला सरकारी वाहन मागे टाकत होते. त्या वेळी त्या वाहनाने सरकारी वाहनाला ‘कट’ मारल्याने (जवळून नेल्याने) सरकारी चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन उलटले. या अपघातात चालक कैलास कसबे जागीच ठार झाले. वाहनाला पकडण्यासाठी नाशिक जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.






