त्या बैठकीत गौतम अदाणी होते का?; अजित पवारांनी एका शब्दात विषय संपवला, काय म्हणाले एकदा ऐकाच
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप युतीसाठी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानीही उपस्थित होते, असा दावा अजित पवार यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राज्यभरातून टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी आता त्या विधानावरून घुमजाव केलं आहे.
२०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाच्या युतीसाठी पाच बैठका झाल्या होत्या. या बैठकीला अमित शहा, गौतम अदाणी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार उपस्थित होते. बैठकीत भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली होती. सर्व काही ठरलं होतं. मात्र त्या घटनेची जबाबादारी माझ्यावर आली आहे. ती जबाबदारी मी घेतली आहे. बाकी सर्वांना मी सुरक्षित केलं आहे, असं विधान अजित पवारांनी केलं होतं.
त्याच्या या विधानाचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर माध्यमांनी अजित पवारांना घेरलं. त्या बैठकीत गौतम अदानी होते का? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना केला. त्यावर अजित पवारांनी नव्हेत असं म्हणत एका वाक्यात विषय संपवला आहे. २४ तासांत अजित पवारांनी आपलं विधान का फिरवलं, आता यावर राज्यभरात चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा–पंतप्रधान मोदींचा ग्लोबल साउथ दौरा; नायजेरिया ते गयाना प्रवास,’हे’ आहे पूर्ण वेळापत्रक
अजित पवारांनी केलेल्या विधानावर भाजपनेही खुलासा केला आहे. अजित पवार ज्या बैठकीविषयी सांगत आहेत ती बैठक २०१९ ची नाही तर २०१७ ची असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनीही माध्यामांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. ऑन कॅमेरा सांगतेय, अशी कोणतीही बैठक झाली याची कोणतीही माहिती नाही. ती बैठक झाली की नाही हे ही माहिती नाही. त्यावेळी जो सकाळचा शपथविधी झाला तोही मला माहिती नाही, मी झोपेत होते आणि सदानंद सुळेंनी उठवंल नी सांगितलं की बघा आपल्या राज्यात काय चाललंय, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक झाली असती तर आमचं सरकारही आलेलं पहायला मिळालं असतं. त्यामुळे अशा प्रश्नांनाही काही अर्थ नाही. ही गोष्ट खरी आहे की, निवडणुका आणि तो कालावधी सोडल्यानंतर केंद्रातले मंत्री आणि उद्योगपती भेटत नाहीत, असे मी म्हणालेलो नाही आणि ही गोष्टही खरी आहे की, अनेकवेळेला अजित पवार यांना सोबत घेऊन उद्योगपती गौतम अदाणींची भेट घेतलेली आहे. त्यांना (अजित पवार) माहिती मिळावी हा त्यामागचा हेतू होता, असं शरद पवार यांनी एका वृ्त्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.