अकोला पोलिसांचे 'ऑपरेशन प्रहार' यशस्वी (Photo Credit - X)
निवडणुकीच्या धामधुमीतही कारवाई
अकोला पोलीस दलामार्फत अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध ही धडक मोहीम सुरू आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या काळातही पोलिसांनी एकूण ७५ प्रकरणे दाखल करून ₹७ लाख ४६ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत एका दिवसात अकोला पोलीसांकडून मोठी कारवाई!
87 केसेस🚨 एकूण ₹ 9.64 लाखांचा💰 मुद्देमाल जप्त करून अवैध दारू केली नष्ट!🥃🧉🍶🛢️🏺✨@archit_IPS | @DGPMaharashtra #Operation_Prahar #AkolaPolice pic.twitter.com/dBQhDF6kL1 — अकोला पोलीस – Akola Police (@AkolaPolice) November 28, 2025
हे देखील वाचा: Akola News: पोदार प्रेप शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन! साऱ्यांचा उत्साह भिडला गगनाला
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले:
“दारूविक्री रोखण्यासाठी अकोला पोलीस दलाने ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत धडक मोहीम राबविली असून, यापुढेही अशी मोहीम सुरूच राहणार आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे.”
दोन दिवसांत ९५ प्रकरणांत १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला पोलीस दलामार्फत ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत ३० व ३१ नोव्हेंबर असे दोन दिवस विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तब्बल ९५ प्रकरणे दाखल करण्यात आली. ₹१२ लाख १२ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ९२ ठिकाणी, तर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ३ ठिकाणी, अशा एकूण ९५ ठिकाणी कारवाई केली.
मोहीम ठरली निर्णायक
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडूनही गावखेड्यात, नदीकाठी, दुर्गम ठिकाणी, नाल्यांमध्ये मोहापासून गावठी दारू काढणाऱ्यांवर वारंवार कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे. अवैध गावठी दारू उत्पादनामुळे जनतेच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याने ही मोहीम निर्णायक ठरत आहे.






