धक्कादायक! प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जावरकर यांनी संपवलं आयुष्य; विषारी इंजेक्शन टोचून घेतलं
अकोल्यातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. न्यू तापडिया नगरमधील राहत्या घरी त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. एका मानसोपचार तज्ज्ञाने स्वत: आयुष्य संपवल्यामुळे खळबळ माजली आहेे.
Pune Crime News : पालखी दर्शनात गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरी; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पेशंटच्या समस्या समजून घेऊन त्यांना मानसिक आधार देणारे आणि नेहमी सकारात्मक विचार मांडणाऱ्या डॉ. जावरकर स्वतःच टोकाचं पाऊल उचलल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. स्वत: मानोसोपचार तज्ज्ञ असणारे डॉक्टर इतक्या मोठ्या तणावाखाली होते का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विषारी इंजेक्शन टोचून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू गेल्याची माहिती पोलिसांना दिली. समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरांनीच आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मानसोपचार डॉ. जावरकर अकोल्यातील ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांच्या सन्मित्र हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. तणाव, नैराश्य आणि मानसिक आजारांनी त्रस्त रुग्णांना समुपदेशन करून मदत करणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःच जीव संपवल्याची घटना सुन्न करणारी ठरली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
अकलूजच्या गणेशगावमध्ये शेतकऱ्याची निर्घृण हत्या; डोकं, तोंडासह पायावरही धारदार हत्याराने केले वार
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात दोषोरापपत्र दाखल करण्यात आलं आहे. आत्महत्येच्या 59 दिवसानंतर आरोपी मनीषा मुसळे हिच्या विरोधात पोलिसांनी 720 पानांचं दोषारोपपत्र दाखल केलं आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येस मनीषा मुसळे याच कारणीभूत असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. ‘मनीषाची रुग्णालयातील अरेरावी व पैशांचा गैरव्यवहार समजल्यावर डॉ. वळसंगकर यांनी डिसेंबर 2024 पासून तिचे अधिकार कमी केले होते. त्यानंतर डॉ. शिरीष वळसंगकर शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी आले होते. रात्री 8:30 बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. त्यानंतर दुसरा राउंड फायर झाल्यानंतर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, असं दोषारोपपत्रामध्ये पोलिसांनी म्हटलं आहे.