शिरोली : अंबप (ता. हातकणंगले) येथे सोमवारी (दि. २९) ग्रामसभाघेण्यात आली. यामध्ये डिजे, लेझर शो, दारू, मटका, गुटखा बंदी यांसह गावामध्ये मोठ्या प्रमाणात लावले जाणारे डिजिटल फलक बंद करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच दीप्ती माने होत्या.
वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विकासराव माने, उपसरपंच अविनाश अंबपकर, तलाठी एकनाथ पाटील, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड,ग्रामसेवक धनाजी शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्या
मनीषा माने, माजी उपसरपंच राजेंद्र माने, अजित माने, सारिका हिरवे, संकेत जाधव, आशीफ मुल्ला, माणिक दाभाडे, ज्योती माने, संदीप पाटील, रेखा गायकवाड, जयश्री शिंदे, सरिता कांबळे, कृष्ण गायकवाड,रूपाली दाभाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष उंडे, माजी सरपंच विश्वनाथ पाटील, माजी सैनिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, आशा सेविकासह विविध संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभेतील ठराव
नागनाथ देवाची पालखी गावातील प्रमुख मार्गावरून काढणे, संपूर्ण गावांमध्ये सीसीटीव्ही बसविणे,
आठवड्यातून एकदा ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन गावभागातील प्रमुख चौकाची श्रमदानातून स्वच्छता करणे, गावातील इलेक्ट्रिक पोल, सार्वजनिक ठिकाणी झेंडे, डिजिटल पोस्टरला मर्यादा असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.