किल्ले पन्हाळगड येथे सकल मराठा समाजा कडून रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शिवमूर्तीस पुष्पहार घालून जालन्यातील आंतरवली सराटी गावामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.
पन्हाळा : किल्ले पन्हाळगड येथे सकल मराठा समाजा कडून रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शिवमूर्तीस पुष्पहार घालून जालन्यातील आंतरवली सराटी गावामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. शिवमंदिर ते सज्जा कोटी ते बस स्थानक ते बाजीप्रभू चौक ते मयूर उद्यान असा निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये सकल मराठा समाजातील बांधव व मात भगिनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या यावेळी सर्व जातीधर्माच्या लोकप्रतिनिधी व नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला यावेळी सराटी गावामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली .
पन्हाळा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
Web Title: All maratha community protest at panhalgad nrab