ऑनलाईन शॉपिंगमध्ये झाली ग्राहकाची फसवणूक (फोटो सौजन्य - istock)
बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा लोक ऑनलाईन शॉपिंग करणं अधिक पसंत करतात. ऑनलाईन शॉपिंगमुळे आपला वेळ वाचतो, तसेच ऑनलाईन शॉपिंगचे फायदेही अनेक असतात. पण या फायद्यांप्रमाणेच ऑनालईन शॉपिंगचे मोठ्या प्रमाणात तोटे देखील आहेत. ऑनालईन शॉपिंगमध्ये नागरिकांची फसवूणक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा ऑर्डर येतच नाही, तर काही वेळा चुकीची ऑर्डर येते. त्यामुळे ऑनालईन शॉपिंगचे फायद्यांइतकेच तोटेही आहेत. ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवूणक केली जात आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे.
हेदेखील वाचा- महायुती सरकारच्या भूमिकेला न्यायालयाकडून शिक्कामोर्तब; मंत्री विखेंनी मानले आभार
एका ग्राहकाने ई कॉमर्स वेबसाईट Amazon वरून 32 हजार रुपयांचे घड्याळ ऑर्डर केलं होतं. ग्राहकाला त्याची ऑर्डर वेळेवर डिलवर झाली. मात्र या ऑर्डरमध्ये असलेले घड्याळ जुनं असल्याचा दावा संबंधित ग्राहकाने केला आहे. याबाबत त्याने सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. @Disciplined_Inv या नावाच्या अकाऊंटवरून X वर पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये त्याने घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे.
Fraud by Amazon:
I had ordered a Tissot PRX watch on 21st July from @amazonIN. I received the watch on 28th July from the seller Mega Store LLP.
I entered its serial number to check its authenticity on Tissot’s website. I found that the watch was purchased on 15th Feb 2023. pic.twitter.com/6Pa5xhiTaJ
— The Disciplined Investor (@Disciplined_Inv) August 13, 2024
पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी 21 जुलै 2024 रोजी टिसॉट पीआरएक्स घड्याळ Amazon वरून ऑर्डर केले. मला 28 जुलै 2024 रोजी ह्या घड्याळाची डिलीवरी मिळाली. यानंतर मी टिसॉटच्या वेबसाइटवर गेलो आणि घड्याळाची सत्यता तपासण्यासाठी त्याचा अनुक्रमांक प्रविष्ट केला. यावेळी मला समजलं की, मला डिलीवरी देण्यात आलेल्या घड्याळाची 15 फेब्रुवारी 2023 रोजी विक्री झाली होती. त्यामुळे जुनं वापरण्यात आलेलं घड्याळ मला डिलीवरी करण्यात आलं. यानंतर मी कंपनीनकडे तक्रार करत घड्याळ बदलण्याची प्रक्रिया सुरु केली. यानंतर कंपनीने मला दुसरं घड्याळ पाठवलं. पण मला बदलून आलेले घड्याळ टिसॉट बॉक्समध्ये होते आणि त्यात अरमानी कंपनीचे घड्याळ होते.
हेदेखील वाचा- दोन्ही पलटूराम मोदी सरकार पाडणार; राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी अध्यक्ष कॅप्टन यादव यांचा दावा
पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, याबाबत पुन्हा 6 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीकडे तक्रार केली. 8 ऑगस्टपर्यंत या समस्येवर तोडगा निघेल असं आश्वासन कंपनीने दिलं. मात्र 8 ऑगस्टपर्यंत कंपमीनीकडून कोणत्याही प्रकारचे अपडेट न आल्यामुळे 8 ऑगस्ट रोजी पुन्हा संपर्क साधला असता चौकशीसाठी आणखी एक तक्रार द्यावी लागेल आणि 12 ऑगस्टपर्यंत समस्या दूर होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे ग्राहकाने 12 ऑगस्टला कंपनीला पुन्हा कॉल केला, तब्बल 45 मिनिटे हा कॉल सुरु होता. पण यावेळी देखील कोणतीही मदत मिळाली नाही. कंपनीने पुन्हा 24 तास थांबायला सांगितले.
पोस्टमध्ये म्हटलं आहे की, यानंतर 13 ऑगस्ट रोजी पुन्हा काही तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकाच्या समस्येवर तोडगा काढण्यात अडचण येत असल्याची माहिती कंपनीने दिली. त्यामुळे कंपनीने पुन्हा 48 तासांचा वेळ मागितला आहे. 2 ऑगस्ट रोजी माझ्या काकांचा वाढदिवस आहे, मी त्यांना हे घड्याळ गिफ्ट करण्यासाठी ऑर्डर केलं होतं. पण आता मला फक्त मानसिक ताण सहन करावा लागत आहे.