रायगडापासून प्रेरणा घेऊ नये म्हणून इंग्रजांनी हा किल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण स्वराजाची संकल्पना ही शिवाजी महाराजांची होती. महाराजांनी 200 वर्षांपासून सुरू असलेली मुघलांची गुलामगिरी संपवली. स्वातंत्र्याची प्रेरणाही त्यांचीच होती. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहे. जेव्हा 100 वर्ष होतील तेव्हा भारत जगात पहिल्या क्रमांकावर असेल, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे,’ असा संकल्प अमित शाह यांनी केला.