मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी आज, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. यानंतर आता अमृता फडणवीस यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अमृता फडणवीस या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता यांनी पहिल्यांदाच ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमधून नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं, “महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनःपूर्वक शुभेच्छा!”
Hearty congratulations & best wishes to our Chief Minister Shri @mieknathshinde & Deputy CM Shri @Dev_Fadnavis !
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) June 30, 2022
[read_also content=”धनंजय मुंडेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; भाजपमध्ये करणार प्रवेश? https://www.navarashtra.com/maharashtra/dhananjay-munde-meets-devendra-fadnavis-will-he-join-bjp-nrdm-299381/”]