अंजली दमानिया यांनी घेतली अजित पवारांची भेट (फोटो- सोशल मिडिया)
Anjali Damania and Deputy Chief Minister Ajit Pawar meeting : महाराष्ट्राच्या राजकारणाती एक अनोखी भेट म्हणता येईल. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. संतोष खून प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे त्यांनी अजित पवारांसमोर सादर केली. महाराष्ट्रात सध्या सर्वात हाय व्होल्टेज प्रकरण असलेल्या संतोष देशमुख खून प्रकरणात अनेक नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणानंतर वाल्मिक कराडच्या समस्या आणखी वाढणार आहेत. पुरावे सादर केल्यानंतर अंजली दमानिया यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा
महाराष्ट्रात असे राजकारणी नको, हे असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात नको आहे. त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा तातडीने घ्यावा, असे मोठे वक्तव्य अंजली दमानिया यांनी केले. मी सर्व पुरावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केले आहेत. अजित पवार यांनी सर्व पुरावे गंभीररित्या पाहिले असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. एवढे पुरावे सादर केल्यानंतरही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर हे अत्यंत चुकीचे होणार आहे.
हेही वाचा: Santosh Deshmukh: देशमुख हत्या प्रकरणातील ‘या’ मुख्य आरोपीला SIT कोठडी; मोबाईलमध्ये काय सापडलं?
महाराष्ट्राच्या राजकारणातील अनोखी भेट
महाराष्ट्राच्या राजकारणात अंजली दमानिया यांनी काही वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या गंभीर आरोप करीत मोठे खुलासे केले होते. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडली होती. त्यामुळे अंजली दमानिया आणि अजित पवार यांचा 36 चा आकडा आहे. हे सर्व असताना त्यांनी अजित पवार यांची भेट घेणे हे निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घटना आहे. हे सर्व बाजूला ठेवून अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख खून प्रकरणी महत्त्वाचे पुरावे अजित पवार यांना सादर केले. हेच त्यांनी माध्यमांसमोर सांगत मी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले परंतु ही घटना किळसवाणी आहे. हा प्रकार महाराष्ट्रात नको म्हणून मी त्यांना भेटली आहे.
वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडला केज कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याधी केज कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती. आज वाल्मीक कराडची सीआयडी कोठडी संपली होती. त्यामुळे आज वाल्मीक कराडला पुन्हा केज कोर्टात हजर करण्यात आले होते. याशिवाय कराडवर मकोका (MCOCA) लावण्यात आला आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणात नवनवीन खुलासे
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणातील 7 आरोपीवर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मीक कराडवर देखील मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान आता बीडमधून एक आणखी महत्वाची बातमी समोर येत आहे.
हेही वाचा: Walmik Karad news: वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्याची तयारी; ‘एसआयटी’ने उचलले मोठे पाऊल
सुदर्शन घुलेवर आरोप
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला सुदर्शन घुलेला कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुदर्शन घुलेला आता एसआयटी कोठडी सुनावली आहे. एसआयटीने सुदर्शन घुलेला पोलीस कोठडी देण्याची मागणी कोर्टासमोर केली होती. त्या अर्जावर आज सुनावणी पार पडली. दरम्यान त्यानंतर कोर्टाने सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधून सर्व डाटा हस्तगत करण्यात आला आहे. देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुलेने वाल्मीक कराडशी फोनवरून संभाषण केले होते. सुदर्शन घुलेच्या अर्जावर बीड कोर्टात सुनावणी पार पडली. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलपैकी एका फोनचे लॉक ओपन करणे आणि इतर तपासासाठी पोलिसानी घुलेच्या कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजूनच युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने घुलेला कोठडी सुनावली आहे.