(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आर्ट अँड क्राफ्ट विभागातील ब्रँड फेविक्रिलने “आर्टिस्ट इन मी (AIM)” या अद्वितीय आणि परिवर्तनशील कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील १०० हून अधिक कलाकारांना तीन दिवसांच्या इमर्सिव अनुभवासाठी मुंबई येथे एकत्र आणण्यात आले. हे १००+ कलाकार ब्रँडच्या प्रमुख ‘फेविक्रिल सर्टिफाइड प्रोफेशनल्स’ कार्यक्रमाशी संलग्न असलेल्या हजारो कलाकारांमधून निवडले गेले आहेत.
पिडिलाइट इंडस्ट्रीजचे कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सीनियर वाइस प्रेसिडेंट कश्यप गाला यांनी सांगितले, “आर्टिस्ट इन मी केवळ एक वर्कशॉप नाही, तर हा असा एक चळवळीचा भाग आहे, ज्याद्वारे भारतीय कलाकारांना बदलत्या आणि विकसित होणाऱ्या सर्जनशील जगाच्या मध्यभागी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही त्यांना जे उपकरणे, अनुभव आणि मेंटरशिप देत आहोत त्यातून केवळ भारताची कलात्मक विविधता साजरी होत नाही, तर हे कलाकार त्यांच्या समाजात शिक्षक, उद्योजक आणि सांस्कृतिक दूत बनण्याच्या मार्गावर देखील जात आहेत.”
‘एक राधा एक मीरा’नंतर मृण्मयी देशपांडेचा नवीन सिनेमा, ‘मनातली’टीमसोबत करणार कल्ला
यावर्षीच्या या रेसिडेंसी प्रोग्राममध्ये भारतीय कला आणि डिझाईन क्षेत्रातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वांनी भाग घेतला. ज्यामध्ये धाडसी आणि संस्कृती प्रेरित समकालीन कला यासाठी ओळखले जाणारे पी.एस. राठौर आणि टेक्स्टाईल डिझाईन वेंचर ‘व्होम’ च्या संस्थापक शुचिता संचेतीयांचे देखील समावेश आहे.
या दोघांनी “भारताचे कला प्रकार” या थीमखाली पारंपरिक पद्धती आणि ट्रेंड्स कला, डिझाईन, इंटिरिअर्स आणि फॅशन क्षेत्रातील यांवर सखोल चर्चा केली. त्यांच्या सत्रांमध्ये वॉल आर्ट, शाश्वतता, विषमता आणि सीमलेस सुर्रियलिझम यांसारख्या विषयांचा समावेश होता, ज्यामुळे कलाकारांना आधुनिक सौंदर्यशास्त्राच्या बदलत्या जगाची अधिक चांगली समज मिळाली.
बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आराध्या पटेल गाजवणार छोटा पडदा, मालिकेचा प्रोमो रिलीज
या कार्यक्रमाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सर्व सहभागी कलाकारांनी मिळून तयार केलेले एक भव्य, शाश्वत भित्तीचित्र (म्युरल) इन्स्टॉलेशन. ही कलाकृती या कार्यशाळेच्या दीर्घकालीन ठसा म्हणून स्थापन करण्यात आली.
मुंबईत झालेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात प्रात्यक्षिक सत्रे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वर्कशॉप्स आणि इंटरअॅक्टिव्ह चर्चा यांचा समावेश होता, ज्यामुळे खुले संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन मिळाले. केवळ कलात्मक प्रशिक्षणच नव्हे, तर या वर्कशॉप्सद्वारे सहभागी कलाकारांना सोशल मीडिया व्यवस्थापन, डिजिटल प्रमोशन आणि व्यवसायिक संधी यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचे शिक्षणही देण्यात आले, ज्यामुळे ते आजच्या डिजिटल आणि व्यावसायिक जगात यशस्वी होऊ शकतील.