पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (Lok Sabha Elections Result 2024) आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतल्याचे दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जोरदार आघाडी घेतली. तर भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी सहा ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी पाहिला मिळत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदेंनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तर भाजपचे उदयनराजे भोसले हे कमालीचे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदेंनी आघाडी घेतली आहे. तर उदयनराजे भोसले हे सध्या 795 मतांनी पिछाडीवर आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील आघाडीवर आहेत. सहाव्या फेरी अखेरीस धैर्यशील मोहिते-पाटील हे 17 हजार 57 मतांनी आघाडीवर आहेत.
पाहा फेरीनिहाय मतांची आकडेवारी
धैर्यशील मोहिते-पाटील –
पहिली फेरी-24243
दुसरी फेरी-23762
तिसरी फेरी-22785
चौथी फैरी-22559
पाचवी फेरी-27170
सहावी फेरी-14688
एकुण – 1 लाख 35 हजार 207
——————-
भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर –
पहिली फेरी-19685
दुसरी फेरी-19923
तिसरी फेरी-20910
चौथी फेरी-21825
पाचवी फेरी-21313
सहावी फेरी-14534
एकूण – 1 लाख 18 हजार 150