गोंदिया : पुणे येथे पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या गोंदियातील दहशतवादी अब्दुल कादीर पठाण (वय 35) याला गोंदिया रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कन्हारटोली इथून पोलिसांनी सापळा रचून अटक केली होती. नंतर पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आहे होते. त्यानंतर या प्रकरणात पुणे एटीएस ने गोंदिया येथील दहशतवादी अब्दुल कादीर पठाण याला घेऊन गोंदिया येथे त्याला ज्या ठिकाणावरून अटक केली होती, त्या ठिकाणी चौकशीसाठी आणण्यात आले. त्या ठिकाणावरून काही साहित्य देखील जप्त करण्यात आले.
तब्बल 9 तासांच्या तपासणीनंतर दहशतवादी अब्दुल कादीर पठाण ला पुणे एटीएस पथकाने परत पुणे येथे नेले आहे. या संपूर्ण तपासामध्ये अब्दुल कादीर पठाण गेल्या अनेक वर्षांपासून पुणे येथे वास्तव्यास असल्याने तो आपल्या नातेवाईकांकडे काही कामानिमित्त आला होता. याची माहिती गोंदिया पोलिसांना देण्यात आली की, दहशतवादी अब्दुल कादीर पठाण हा गोंदिया येथे आला आहे.
दरम्यान याच माहितीच्या आधारावर गोंदिया पोलिसांनी कनारटोली येते आपल्या नातेवाईकांकडे थाबलेल्या दहशतवादी अब्दुल पठाण याला गोंदिया पोलिसांनी अटक केले. या प्रकरणाचा पूर्ण तपास पुणे येथे एटीएस कडे असल्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले.