पुणे : पोलीस हवालदारानेचं पत्नीला ऑमलेट निट बनवता येत नाही म्हणून तिचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न केल्याचा व मुलगा सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मनिष मदनसिंग गौड (वय ५०, दत्तविहार सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष गौड हा पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहे. तर तो आंबेगाव बुद्रुक येथील दत्तविहार सोसायटीमध्ये राहण्यास आहे. मनिष यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी ऑमलेट बनवले होते. पण, ऑमलेट बिघडले होते. त्यामुळे मनिष हा पत्नीवर ओरडला. त्याने तुला ऑमलेट निट बनवून देता येत नाही का ? म्हणत शिवीगाळ केली. त्यांच्या अंगावर धाऊन जात हाताने मारहाण करून फ्रिजवर ठेवलेली इलेक्ट्रॉनिक पक्कड उचलून डोक्यात घातली. यात त्या जखमी झाल्या. त्यानंतर दोन्ही हातने गळा दाबून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. हे सर्व सुरू असताना त्यांचा मुलगा त्यांची भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडला असता त्याने मुलालाही मारहाण केली.
[read_also content=”लाचप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह शिपायावर गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/a-case-has-been-registered-against-constable-along-with-assistant-police-inspector-in-bribery-case-nrdm-338245.html”]
संबंधीत महिलेने पोलीस ठाण्यात येऊन तिच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे सहाय्यक निरीक्षक सचिन धामणे यांनी सांगितले.