बच्चू कडू यांचे आंदोलन मागे (फोटो - सोशल मिडिया)
अमरावती: गेले 7 दिवस प्रहारचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. दरम्यान आज बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर न केल्यास मंत्रालयात घुसू असा इशारा बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे.
बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी गेले 7 दिवस अन्नत्याग आंदोलन करत आहेत. यावेळेस त्यांची प्रकृती खालावली होती. आज मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यानंतर बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. त्यासोबतच राज्य सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा इशारा दिला आहे.
मंत्री उदय समान यांनी बच्चू कडू यांना पाणी पाजून त्यांचे अन्नत्याग आंदोलन सोडवले. दरम्यान त्या आधी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना आपले अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली होती. त्यांनी कडू यांची मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा घडवून आणली होती. मात्र बच्चू कडू हे इपोषणावर ठामण होते. अखेर आज त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले असून, सरकारला 2 ऑक्टोबरपर्यन्तचा इशारा दिला आहे.
अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ
आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यावर असताना शहरात त्यांचा एक कार्यक्रम सुरू होता. मात्र या कार्यक्रमात काहीसा गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
Ajit Pawar Pune News: अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ; बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी थेट…
प्रहारचे नेते बच्चू कडू यांना विविध संघटना व पक्षांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्य प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. याबाबत त्यांंनी सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांची भूमिका मांडली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिले आहे की, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरु होते. कडू यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे वास्तव आहे, शेतकरी आज मोठ्या संकटात आहे, शेतमालाला भाव नाही, राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, सत्ताधा-यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी पूर्णपणे हताश आणि निराश झालेला आहे, अशी भूमिका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली आहे.