धक्कादायक! 843 महिलांचे गर्भाशय काढले, ऐन तारुण्यात मरणयातना
बीडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 30 ते 35 वयोगटातील तब्बल 843 महिलांचे गर्भाीशय काढण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या महिलांना ऐन तारुण्यात मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ऊसतोड महिलांचे गर्भाशय काढण्याचे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान सरकारने या महिलांना मानदन देण्याची मागणी ऊसतोड कामगार संघटनेने केली आहे.
बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या जिल्ह्यातून दीड लाखाहून अधिक ऊसतोड मजुरांचं राज्याच्या इतर भागात स्थालांतर होतं. ऊस तोडणी हंगाम सुरू झाल्यानंतर मजूर दिवाळी दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात ऊस तोडणीसाठी जातात. सहा महिने ऊस तोडणी करून मार्च महिन्यापर्यंत त्यांचा परतीचा प्रवास असतो. आरोग्य विभागाकडून ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि परत आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते.
मात्र याच स्थलांतरा दरम्यान 843 ऊसतोड महिला कामगाराचे गर्भाशय काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे यात ३० ते ३५ वयोगटातील महिलाचा अधिक समावेश आहे. गर्भाशय काढल्यानंतर काढल्यानंतर अनेक या महिलांना आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मासिक पाळीत रक्तस्त्राव होणे, जंतुसंसर्ग, पोटात दुखणे अशा गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. त्यामुळे गर्भाशय काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र गर्भाशय काढल्यानंतर मात्र असंख्य आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर ज्या महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ऊस तोडणी करतात, त्या महिलांना दहा ते पंधरा वर्षांपूर्वी गर्भाशय काढले आहेत, त्यांना आता मरण यातना सहन कराव्या लागत असल्याचं स्वत: महिलांनी सांगितलं.