Big Protest Of Farmers In The Ministry Jumps On Safety Nets Know What Are The Demands Nrab
मंत्रालयात शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन, सुरक्षा जाळ्यांवर मारल्या उड्या , जाणून घ्या काय आहेत मागण्या
विदर्भातील अमरावती भागातून शेतकरी मंत्रालयात आले आहेत. धरणग्रस्तांच्य प्रश्नाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अप्पर वर्धा धरणग्रस्त सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. मंत्रालयातील सुरक्षा जाळींवर उड्या मारून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
विदर्भातील अमरावती भागातून शेतकरी मंत्रालयात आले आहेत. धरणग्रस्तांच्य प्रश्नाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अप्पर वर्धा धरणग्रस्त सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. मंत्रालयातील सुरक्षा जाळींवर उड्या मारून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. धरणग्रस्तांना न्याय देण्याची मागणी शेतकरी करत आहे. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्यांना आझाद मैदान पोलिस ठाण्यात पाठवले आहेत. पोलिसांनी १२ ते १५ शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. उद्यापर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरामध्ये अप्पर वर्धा धरण आहे. १०३ दिवसांपासून हे शेतकरी मोर्शीच्या तहसिलदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत होते. मात्र न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयात आक्रमक आंदोलन केले. या आंदोलनातील एका शेतकऱ्याला भोवळ आली असून त्याला उपचाराकरीता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. १९७२ साली झालेल्या प्रकल्पाचा योग्य मोबदला न मिळल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य मिळाले नाही.
Web Title: Big protest of farmers in the ministry jumps on safety nets know what are the demands nrab