मुंबई : मायणी गावातील एका जमीनीसंदर्भात बोगस कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore) यांच्याविरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. याप्रकरणी आज भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) सर्वोच्च न्यायालयानंही (Supreme Court) बुधवारी फेटाळून लावला आहे. त्यामुळं जयकुमार गोरंच्या अडचणीत वाढ झाली असून, गोरेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. (Jayakumar Goran’s difficulty increase)
[read_also content=”शिवसेना फोडण्याचं काम शरद पवारांनी केलं, दीपक केसरकर यांची शरद पवारांवर टिका https://www.navarashtra.com/india/sharad-pawar-did-the-job-of-blowing-up-shivsena-deepak-kesarkar-303795.html”]
दरम्यान, वडूज जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती. मात्र कुठेच दिलासा न मिळाल्यानं जयकुमार गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पूर्णपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं. त्यामुळे गोरेंची अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं त्यांना सत्र न्यायालयात शरण जाऊत रितसर जामीन घेण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायणी गावातील एका जमीनीसंदर्भात बोगस कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, महेश पोपट बोराटे (बिदाल), दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (विरळी) यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका तलाठ्याचा सुद्धा सहभाग आहे. मात्र तो सध्या फरार आहे.