परिणय फुकेंची सपकाळ यांच्यावर टीका (फोटो- सोशल मिडिया)
नागपूर: आज नागपूरमध्ये भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राहुल गांधी, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील भाष्यकेले आहे.
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके म्हणाले, “ऑपरेशन ब्ल्यू वर राहुल गांधी यांनी माफी मागितली. म्हणजेच देर आये दुरुस्त आये.. असेच झाले. शिख बांधवांच्या हत्या करून त्यांना बेघर करण्यात आले होते. हे पाप काँग्रेसने केले. राहुल गांधी यांनी याबद्दल माफी मागितली. ही माफी आधीच मागितली असती तर बरे झाले असते.”
पुढे बोलताना परिणय फुके म्हणाले, “सध्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत असल्यासारखे चित्र आहे. पक्षातील कार्यकर्ते काम करण्यास तयार नसल्याने ते पडत्या काळात माफी मागत आहेत. आता माफी मागणे म्हणजे राहुल गांधी राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्याने मलीन झालेली आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.”
“देशात लवकरच जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे. यामुळे कोणाची संख्या किती आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांनी घाई न करता शांत रहावे. जातीनिहाय जनगणना झाल्यावर मराठा समाज ३२ टक्के आहे की किती टक्के आहे हे स्पष्ट होईल. त्यानंतरच आरक्षण असो व किंवा कोणत्या सोयी सुविधा द्यायच्या, कोणत्या योजना आणल्या पाहिजेत हे स्पष्ट होईल”, असे भाजप आमदार परिणय फुके म्हणाले.
यावेळेस बोलताना फुके यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, “हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षातील लोकं त्यांना स्वीकारत नसल्याने “पॅराशूट” नेता म्हणून ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना लादले गेल्याने काही वक्तव्ये करून प्रकाशझोतात राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
परभणीतून काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला सुरुवात; हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर जोरदार टीका
हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर जोरदार टीका
भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.