मुंबई : आज महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार आहे. तर, खासदार संजय राऊत (Sanajy Raut) आणि सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनीही केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आत भाजप मोर्च काढणार आहे. संताबद्दलच वक्तव्य केल्याने सुषमा अंधारे यांचा विरोध केला जात आहे तर संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरून केलेल्या वक्तव्यावरून भाजप (BJP) आक्रमक झाला आहे. भाजप मुंबईतर्फेही आजा शहरात माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे.
[read_also content=”आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा! असे आहेत वाहतूक व्यवस्थेतील बदल https://www.navarashtra.com/maharashtra/mahavikas-aghadi-grand-morcha-in-mumbai-today-such-are-the-changes-in-the-transport-system-354136.html”]
संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सध्या चांगलाच वाद निर्माण झाला आहे. बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला होता. पण संजय राऊत यांनी बोलण्याच्या ओघात बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं सांगितलंय. यावर राऊत यांच्याविरोधात सर्वच स्तरातून टिका करण्यात येत आहे. सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या विधानाविरोधात भाजपच्या या माफी मांगो आंदोलनात अनेक भाजप नेते सहभागी होणार आहेत. आज भाजप नेते अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर आंदोलन करणार अहेत. तर अमित साटम, आगरकर चौक, अंधेरी पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला आंदोलन करणार. मनोज कोटक, राम कदम, निलयोग मॉल, जवाहर रोड, घाटकोपर पूर्व येथे आंदोलन करणार.