बुलढाणा जिल्ह्यात प्रकल्पांमध्ये 23.13 टक्के जलसाठा; पाऊस लांबला तर अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचं सावट
बुलढाणा जिल्ह्यातील 3 मोठे, 7 मध्यम, 37 लघु प्रकल्प व 4 कोल्हापुरी बंधारे मिळून पाण्याची 15 जून 2025 रोजीची टक्केवारी 22.13 तर मागील वर्षीं याच तारखेपर्यंत 15.328 इतकी टक्केवारी होती, 2024 व 2025 ची टक्केवारी पाहता यंदाची टक्केवारी अधिक आहे. गतवर्षी म्हणजे 2024 च्या पावसाळ्यात पडलेला पाऊस आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प हे 100 टक्के भरले होते. त्यामुळे नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे, असे प्रकल्पापैकी प्रशासनाला वाटले होते. परंतु, एप्रिल प्रकल्पात माहिन्याच्या तहानलेले पाहिल्या तहान आता आठवड्यातच प्रशासनाला अनेक गावांमध्ये त्या-त्या गावातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी टैंकर पाठविण्याची वेळ आली.
मे च्या पहिल्या आठवड्यात 25 च्यावर गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. भविष्यात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हे प्रकल्प 100 टक्के पाण्याने भरले असल्याने पाटबंधारे विभागातर्फे या प्रकल्पातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी गावांच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खालावणे साहजिकच आहे. त्यात भरीत भर यंदा मार्च अखेर पासूनच सूर्याने आपले खरे रूप दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने झाल्याने व होत असल्याने या प्रकल्पातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालवत चालली आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील विहिरींची व हातपंपाची आहे. यंदा मान्सून लांबला तर जिल्ह्यातील अनेक गावांची पाण्याची समस्या बिकट होणार आहे. एवढेच नव्हे तर त्या गावातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ज्या गावात पाणीटंचाई आहे, त्या-त्या गावातील नागरिकांना पाण्याचे महत्व कळत आहे. परंतु ज्या गावात मुबलक पाणी आहे, त्या गावातील नागरिकांना पाण्याचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे अशा गावातील ग्रामस्थांमध्ये प्रशासनाकडून जनजागृती करण्याची खरा अर्थाने गरज आहे. मोठे, मध्यम प्रकल्पातील जलसाठ्याची टक्केवारी बुलढाणा जिल्ह्यात 3 मोठे व 7 मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पातील उपलब्ध पाण्याची टक्केवारी अशी आहे, नळगंगा 29.84. दलघमी, खडकपूर्णा निरंक, पेनटाकळी 19.49. दलघमी, ज्ञानगंगा 17.860 दलघमी, मस 4.200 दलघमी, कोराडी 1.490 दलघमी, पलळक 0.700 दलघमी, मन 9.430 दलघमी, तोरणा 0.490. दलघमी व उतावळी 3.540 दलघमी इतका जलसाठा आहे.
हे प्रकल्प तहानलेले
बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या खडकपूर्णा व हिरवड, गुंधा, तांदूळवाडी बयाळ, देवखेड व दुसरबीड या लघु शून्य टक्के जलसाठा असल्याने है प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाची पाचसालयातील भागणार नाही.