सातारा : कोळकी (ता. फलटण) येथे एक लाख ८४ हजार रुपयांची घरफोडी झाल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिनांक ३० नोव्हेंबर रोजीच्या दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान योगेश पोपट गाढवे (वय २६, राहणार कोळकी, तालुका फलटण) यांच्या बंद घराचे कुलूप कटावणीने तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील एक लाख ८४ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर अधिक तपास करीत आहेत.