छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. (Samruddhi Mahanarg Accident) बुलढाण्यामध्ये (Buldhana Bus Accident) समृद्धी महामार्गावर बसला भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरमध्ये कारला भीषण अपघात (Samruddhi Mahanarg Car Accident) झाला आहे. यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
[read_also content=”“मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय शरद पवारसाहेब यांच्यामुळेच”; जयंत पाटील यांनी गुरुपौर्णिमेच्या दिल्या शुभेच्छा… https://www.navarashtra.com/maharashtra/whatever-i-am-it-is-because-of-my-guru-respected-sharad-pawarsaheb-jayant-patil-wishes-guru-poornima-426655.html”]
30 फूट खाली कोसळली कार
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर तालुक्यातील जयपूर-भांबर्डा शिवारात पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. संभाजीनगरहून जालनाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. ही भरधाव कार महामार्गाच्या डाव्या बाजूला जवळपास 30 फूट खाली कोसळली. या अपघातामध्ये चालक पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि मुलगा जखमी झाले आहेत.
सुशीलकुमार थोरात असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेली त्यांची पत्नी आणि बाळ हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी संभाजीनगरला पाठवण्यात आले आहे. या अपघातामध्ये कारचा पूर्ण चक्काचूर झालाय. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेचा तपास सुरु आहे.
दरम्यान, बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे समुद्धी महामार्गावर बसला अपघात झाला होता. या अपघातामध्ये बसने सर्वात आधी एका खांबाला धडक दिली. त्यानंतर ही बस डिव्हायडरला धडकून काही अंतर घसरत गेली. त्यामुळे बसच्या डिझेलची टाकी फुटली आणि बसला भीषण आग लागली होती. बसचा दरवाजाकडचा भाग खालच्या बाजूला गेल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्यास अडथळा निर्माण झाला. बसला लागलेल्या या आगीमध्ये होरपळून 26 प्रवाशांचा मृत्यू झाला. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. प्रवाशांचा अक्षरश: जळून कोळसा झाला त्यामुळे प्रशासनाला ओळख पटवण्यासाठी डिएनए रिपोर्टचा आधार घ्यावा लागला.