होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा 9 जूनपासून सुरू होणार आहेत, तर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थी पुन्हा शाळेच्या वातावरणात परतण्यासाठी तयारी करत आहेत. अनेक शाळांनी प्रवेश प्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे. पालकही मुलांसाठी लागणाऱ्या शालेय वस्तूंची खरेदी करण्यात व्यस्त आहेत. राज्यातील हवामान आणि उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन शाळा सुरू होण्याच्या तारखांमध्ये फरक ठेवण्यात आला आहे. सीबीएसई शाळा प्रामुख्याने शहरी भागात असतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष लवकर सुरू होते. राज्य मंडळाच्या शाळा, विशेषतः ग्रामीण भागात आणि., जि. प.च्या कार्यक्षेत्रात, उशिराने सुरू होणार आहेत. राज्य मंडळाच्या शाळा १६ जून सुरू होणार आहेत.
हेदेखील वाचा : Thane News : RTE’च्या संदर्भात मोठी बातमी; चौथ्या टप्प्यातील प्रवेशासाठी मुदतवाढ
दरम्यान, राज्य मंडळाच्या शाळांचे प्रथम सत्र १६ जून ते १६ ऑक्टोबर असेल. दरम्यान, अनेक शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रम, उपक्रम आणि तांत्रिक सुविधांचे नियोजन सुरू आहे. काही शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण, धोरण २०२० अंतर्गत काही नव्या सुधारणा लागू होणार असल्याने विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीच्या शिक्षणाचा अनुभव मिळेल.
विद्यार्थ्यांमधील अनिश्चितता दूर
राज्य शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा सुरू होण्याच्या तारखा काही दिवसांपूर्वीच निश्चित केल्या आहेत. पुणे विभागातील शाळांसाठी नियमित शैक्षणिक कामकाजाची सुरुवात सोमवार १६ जूनपासून होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये वेळापत्रकाबाबत असलेली अनिश्चितता दूर झाली आहे. उन्हाळ्याचा सुट्टीचे दिवस सुरु आहेत आणि लवकरच विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागणार आहे. अशामध्ये शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षांची सुरुवात कधी होणार? याची सूचना जाहीर केली आहे.