मुंबई : आज केद्रींय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shaha) याचं मुंबई दौरा सुरु झाला आहे. आज सकाळी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी या दौऱ्याचा श्रीगणेशा केला. लालबागचा राजा गणेश मंडळात अमित शाह यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पुजा-अर्चना करत बाप्पाचे आशिर्वाद घेतले.
[read_also content=”कमळाबाईचे हेच तर मिशन होतं…सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/shivsena-criricized-bjp-over-maharashtra-politics-from-saamna-nrps-322524.html”]
रविवारीच अमित शाह मुंबईत दाखल झाले. आज सकाळी त्यांनी सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. अमित शाह यांनी हात जोडून बाप्पासमोर प्रार्थना केली आणि राजाच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी लालबागचा राजा मंडळात अमित शाह यांच्या भेटीनिमित्त विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, अमित शाह यांनी लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्याशीही संवाद साधला. यानंतर त्यांनी वांद्रेतील आशिष शेलार यांच्या सार्वजनिक मंडळ आणि घरी हजेरी लावत बाप्पाचं दर्शन घेतलं.
[read_also content=”शिस्तबद्ध भक्तीभाव! लालबागच्या राजासाठी रेल्वेने केली ‘ही’ मोठी घोषणा; क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमचाही वाचेल त्रास https://www.navarashtra.com/maharashtra/lalbaugcha-raja-lalbaug-market-in-mumbai-railway-available-special-announcement-for-devotees-ganeshotsav-2022-nrvb-322474.html”]