मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा मेळाव्यात निर्धार, ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार
निराला बाजार येथील तापडिया नाट्यगृहात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा नव संकल्प मेळावा पार पडला, त्यावेळी नांदगावकर बोलत होते. ते म्हणाले, ‘तुम्ही मोठे झाला तर पक्ष आपोआप मोठा होतो. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागा.
जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले वेरूळ येथील सुरेश बोरसे यांचा मारहाणीमुळे झालेला मृत्यू हा एक खूनच असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट होते. यात दोन पोलिसही आरोपी आहेत. मात्र, खुनाचा गुन्हा नोंदवण्याऐवजी संबंधित पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी केली.
सध्या इतर पक्षात प्रवेश सोहळे सुरू आहेत. त्याचा भाव काय आहे? मनसेत तसे काही नाही. येथे लोक प्रेमाने येतात. पक्षाला झेंडे, हारतुरे किंवा ढोलताशांपेक्षा प्रामाणिक कार्यकर्ता हवा. दिखाऊ स्वागत पेक्षा संघटनात्मक ताकदीला महत्त्व द्या. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून नवीन आणि शिक्षित तरुणांना मनसेची जोडून राजकारणात आणा, असेही नांदगावकर म्हणाले.
आजच्या नव संकल्प मेळाव्यात महिलांची उपस्थिती अल्प दिसून आल्याने नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. आता महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण असेल. त्यामुळे पक्षात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
‘ऑपरेशन टायगर’साठी ठेकेदाराचे 600 कोटी; ठाकरे गटाचे माजी खासदार खैरे नेमकं काय म्हणाले?






