छ. संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ९,७६५ ई-फेरफार नोंदी रखडल्या! (Photo Credit- Ai)
फेरफार नोंद घेण्यासाठी कालावधीनिश्चित केलेला असतानाही जिल्ह्यात अनोंदणीकृत व नोंदणीकृत (अविवादग्रस्त आणि विवादग्रस्त) अशा मालमत्तेच्या मोठया प्रमाणात ई फेरफार नोंदी रखडल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. यातील एक महिन्यांहून अधिक कालावधीपासून सुमारे १ हजार २९ प्रकरणांचा समावेश असून उर्वरित प्रकरणे मात्र एका महिन्यांच्या आतील आहे.
‘ई फेरफार एमआयएस’च्या ९ जुलैच्या अहवालानुसार अनोंदणीकृत व नोंदणीकृत (अविवादग्रस्त) च्या एकूण ८ हजार ८६४ फेरफारच्या नोंदी प्रलंबित आहेत. यात एका महिन्याच्या आतील प्रलंबित प्रकरणे ८ हजार ७३६च्या घरात आहेत. तर १ ते ३ महिन्याच्या आतील १२२ फेरफार नोंदी प्रलंबित असून ६ नोंदी ह्या ३ महिन्याहून अधिक दिवसापासून रखडल्या आहेत. तर अनोंदणीकृत व नोंदणीकृत (विवादग्रस्त) प्रकारच्या एकूण ९०१ फेरफार नोंदी प्रलंबित असून यात तीन महिन्याच्या आतील ४३५, तीन ते सहा महिन्याच्या मधील २०५ तर सहा महिन्यापेक्षा जास्त दिवसापासून फेरफार नोंदी रखडलेल्या प्रकरणांची संख्या २६१ च्या घरात आहेत. दरम्यान, ई फेरफार नोंदी रखडल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त
जिल्हाधिकारीपदी विनय गौडा जी. सी हे रुजू होताच त्यांनी प्रलंबित ई फेरफार नोंदी प्रकरणांची गंभीर दखल घेत तक्रार नसलेले प्रकरण प्रलंबित राहिल्यास कारवाई होईल, असा इशारा दिला होता. एवढेच नव्हे तर तलाठीस्तरावर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीत प्रलंबित असलेल्या फेरफार बाबत संबंधित तलाठ्क्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचेही निर्देश दिले होते. या इशाऱ्यानंतर यंत्रणा कामाला लागली होती. परंतू त्यास अद्यापही गती देण्याची गरज प्रलंबित प्रकरणाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
| अनुक्रमांक | तालुक्याचे नाव | प्रलंबित ई-फेरफार प्रकरणे (Talukawise Pending Ferfar) |
| १. | छत्रपती संभाजीनगर | ३,३३० (सर्वाधिक) |
| २. | गंगापूर | १,३२९ |
| ३. | सिल्लोड | १,००३ |
| ४. | वैजापूर | ९८९ |
| ५. | पैठण | ८५२ |
| ६. | फुलंब्री | ५४९ |
| ७. | खुलताबाद | ३५१ |
| ८. | सोयगाव | २५० |
| ९. | कन्नड | अहवालात समाविष्ट |
| एकूण | संपूर्ण जिल्हा | ९,७६५ |






