छत्रपती कारखान्यावर अजित पवारांच्या पॅनलचा विजय
बारामती: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानी माता पॅनलने दणदणीत विजय मिळवला. या पॅनलने सर्व २१ पैकी २१ जागा जिंकत विरोधी श्री छत्रपती पॅनलचा पराभव केला. सर्व विजयी उमेदवारांना पाच ते साडेपाच हजार मतांच्या आघाडीने विजय मिळवला.
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची व रंगतदार ठरली. ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जात होती. बारामती व इंदापूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या कारखान्याची सध्या परिस्थिती अडचणीची असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पवार यांनी माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याशी मतभेद बाजूला ठेवत एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
या निवडणुकीत विरोधी श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार करणसिंह घोलप — हे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांचे चिरंजीव — यांचा पराभव झाला. सोमवारी सकाळी नऊ वाजता बारामती शहरातील प्रशासकीय भवन इमारतीत मतमोजणीला सुरुवात झाली. मतदान बॅलेट पेपरवर झाल्यामुळे मतमोजणीत मोठा वेळ लागला. मतपत्रिकांची जुळवाजुळव करून मोजणी केल्यामुळे प्रक्रिया दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत चालू होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निवडणुकीचा कल स्पष्ट होऊ लागला आणि जय भवानी माता पॅनलने मोठ्या मताधिक्याने आघाडी घेतली. पहाटे साडेपाच वाजता अंतिम निकाल जाहीर झाला. त्यानुसार पॅनलचे सर्वच उमेदवार पाच ते साडेपाच हजार मतांच्या फरकाने विजयी ठरले. विजयानंतर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि विजयाच्या घोषणा देत वातावरण उत्साही झाले.
कोण आहे रुची गुज्जर? जिने मोदींच्या फोटोचा हार घालून केली Cannes 2025 च्या रेड कार्पेटवर एन्ट्री
गट क्र.- १ : पृथ्वीराज साहेबराव जाचक (११६९४), अॅड. शरद शिवाजी जामदार (१०५२९),
गट क्र-२ : रामचंद्र विनायक निंबाळकर (१०९२९), शिवाजी रामराव निंबाळकर (१०४३१)
गट क्र -३ : पृथ्वीराज श्रीनिवास घोलप (९६७२), गणपत सोपाना कदम (९२९७).
गट क्रमांक : ४ प्रशांत दासा दराडे (१११८०), अजित हरिश्चंद्र नरुटे (११०९०), विठ्ठल पांडुरंग शिंगाडे (१०२३५)
गट क्रमांक : ५ अनिल सीताराम काटे (११७८९), बाळासाहेब बापूराव कोळेकर (११७६८), संतोष शिवाजी मासाळ (१०३०५)
गट क्रमांक : ६ कैलास रामचंद्र गावडे (११८३२), नीलेश दत्तात्रेय टिळेकर (११५६३) सतीश बापूराव देवकाते (११२६१)
इतर मागास प्रवर्ग : तानाजी ज्ञानदेव शिंदे (११३५८) अनुसूचित जाती जमाती : मंथन बबनराव कांबळे (११५११) महिला राखीव : सुचिता सचिन सपकळ (१०३८४), माधुरी सागर राजापुरे (१०७७४)
भटक्या विमुक्त जाती
डॉ. योगेश बाबासाहेब पाटील (११८४३)
ब वर्ग – अशोक संभाजी पाटील (२८०)