(फोटो सौजन्य - Instagram)
७८ वा कान्स चित्रपट महोत्सव सुरू आहे. या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. काही जण रेड कार्पेटवर आपले ग्लॅमर दाखवून बातम्यांमध्ये येत आहेत तर काहींचे चित्रपट या प्रतिष्ठित कार्यक्रमात प्रीमियर होत आहेत. भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री रुची गुर्जरनेही कान्समध्ये रेड कार्पेटवर आपले वर्चस्व दाखवले. अभिनेत्रीच्या संपूर्ण लुकवरील जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिच्या हारने, ज्याच्या डिझाइनवर पंतप्रधानांचे फोटो लावलेले दिसत होते. रुचीच्या मते, हा हार घालून तिने पंतप्रधान मोदींना श्रद्धांजली वाहिली आहे. रुची गुज्जरचा हा लुक पाहून चाहते चांगलेच थक्क झाले आहेत.
रुचीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोनेरी रंगाचा डिझायनर राजस्थानी लेहेंगा परिधान केला होता. लेहेंग्यातील लूकवर रुचीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोंचा नेकलेस गळ्यात परिधान केला होता. रुचीने परिधान केलेला राजस्थानी लेहेंगा हा रोपा शर्माने डिझाईन केला आहे. रुची गुज्जरचा हा लुक आणि नेकलेस आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आणि चाहते तिच्या फोटोला भरभरून प्रतिसाद देत आहे.
Cannes 2025: रेड कार्पेटवर जान्हवी कपूरचा दिसला ‘रॉयल लुक’ तर, ईशान खट्टरचाही दिसला ‘नवाबी’ अंदाज!
रुची गुजर मिस हरियाणा ठरली
रुची गुज्जरने २०२३ मिस हरियाणा हा किताब जिंकला आहे. रुची गुजर ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन, रुची गुर्जर भारतीय मनोरंजन उद्योगात आपली ओळख निर्माण करत आहे. रुचीने जयपूरच्या महाराणी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. यानंतर, ती अभिनय जगात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली. आणि आता अभिनेत्री तिच्या मॉडेलिंगने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोपा नव्हता अभिनेत्रीचा प्रवास
रुची गुजर ‘जब तू मेरी ना राही’ आणि ‘हेली में चोर’ सारख्या म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. रुचीसाठी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. रुचीचा जन्म राजस्थानमधील एका गुज्जर कुटुंबात झाला. ग्लॅमर जगात करिअर करण्यासाठी अभिनेत्रीला सुरुवातीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. बॉलिवूड एमडीबीला दिलेल्या मुलाखतीत रुची म्हणाली, ‘मी गुज्जर कुटुंबातील असल्याने, मी ज्या क्षेत्रात काम करत आहे तिथे महिलांना हे करण्यास परवानगी नाही.’
George Wendt Death: सर्वांना हसवणारा तारा अचानक मावळला; वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
अभिनेत्रीला मिळाला वडिलांचा पूर्ण पाठिंबा
अभिनेत्री रुची पुढे म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या महिलांबद्दल लोकांचा विचार बदलणे कठीण होते. मला माझ्या समाजात ही प्रेरणा निर्माण करायची आहे, लोकांच्या विचारांविरुद्ध लढणारी. माझ्या समुदायातून मी एकमेव स्त्री आहे जो बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत पोहोचलो आहे. रुचीच्या मते, तिला तिच्या प्रवासात तिच्या वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. रुचीच्या म्हणण्यानुसार, ‘जेव्हा तिने वडिलांना सांगितले की मला बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मुंबईला जायचे आहे, तेव्हा माझी आई खूप घाबरली. तथापि, त्यांना माझ्यावर अभिमान आहे की मी इथपर्यंत पोहचली आहे. माझ्या वडिलांनी पहिल्या दिवसापासून खूप साथ दिली. आता माझे संपूर्ण कुटुंब मला पाठिंबा देत आहे.’ असे अभिनेत्रीने सांगितले.
अभिनेत्रींचे साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्याचे स्वप्न आहे
काही म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केलेली रुची मोठी स्वप्ने पाहत आहे. ती म्हणाली, ‘मला दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करायचे आहे कारण प्रेक्षकांना ते आवडतात.’ मलाही साऊथ चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल. रुची गुज्जरची सोशल मीडियावर मोठी चाहती आहे. इंस्टाग्रामवर ८ लाखांहून अधिक लोक अभिनेत्रीला फॉलो करतात.