खारघरमधील इमारतीवर सिडकोचा दुसऱ्यांदा हातोडा, खोटी कागदपत्र दाखवत विकासकाने खरेदीदारांची फसवणूक केल्याचा दावा
दीपक घरत , पनवेल ग्रामीण: घरात बसून सुंदर टेकड्याचं दृश्य पाहायला मिळेल असे स्वप्न उराशी बाळगून खारघर येथील “हिल व्ह्यू अपार्टमेंट” या इमारतीत घर खरेदी करणाऱ्या रहिवासांवर भर उन्हात बसून इमारतीचे तोडकाम पाहण्याची वेळ बुधवारी ( ता. 2) आली. इमारत उभारताना सिडकोची परवानगी न घेतल्याने खारघर येथील सेक्टर 5 येथील हेदोर वाडी या परिसरात बांधण्यात आलेल्या हिल व्ह्यू अपार्टमेंट या इमारतीवर सिडको विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईची कोणतीच कल्पना नसलेल्या इमारती मधील रहिवाशी गाढ झोपेत असताना पहाटे 4 वाजण्याच्या या सुमारास सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक इमारती बाहेर दाखल झाल्याने झोप उडालेल्या रहिवाशांची घर खाली करताना चांगलीच दमछाक झाली.
खारघर सारख्या वसाहतीत अगदी स्वस्तात घर मिळतंय या अमिषाला बळी पडून आपल्या आयुष्याची जमा पुंजी घर खरेदीत गुंतवणाऱ्या अनेक रहिवाशांना या वेळी अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले असून, घरातील सर्व सामान बाहेर काढण्याची वेळ देखील सिडकोने दिली नसल्याची खंत सेवानिवृत्ती नंतर मिळालेली रक्कम घर खरेदीत गुंतवणाऱ्या व एका महिन्या पूर्वीच इमारतीत वास्तव्याला आलेल्या मूळचे राजापूर येथील रहिवाशी असलेले जयदत्त कुंथळकर यांनी व्यक्त केली.कारवाई दरम्यान मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी तसेच सिडकोचे अधिकारी आणि कर्मचारी घटना स्थळी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले असून सिडकोच्या अनेक बड्या आशिकाऱ्यांनी कारवाई स्थळी भेट देऊन तोडक कारवाईची पाहणी केली.
सिडको अतिक्रमण विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आलेल्या इमारतीवर या पूर्वी देखील कारवाई करण्यात आली होती. मात्र त्या नंतर देखील विकासकाने इमारत पुन्हा उभारून सदनिका विक्री केल्याने सिडकोने दुसऱ्यांदा कारवाई करत इमारत जमीनदोस्त केली आहे.
इमारत उभारणाऱ्या विका सकाकडे पालिकेतील काही माजी नगरसेवकांनी सदनिकाणची मागणी केली होती. विकसका ने ती मागणी पूर्ण न केल्याने च सिडको प्रशासना वर वरून दबाव आणत कारवाई करण्याला भाग पाडण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.
कारवाई दरम्यान धुळी प्रदूषण होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती. या करता सिडकोच्या अग्निशमन विभागाची वाहन कारवाई स्थळी तैनात ठेवण्यात आली होती.या वाहणातून पाण्याचा मारा इमारतीवर करण्यात येत होता.
इमारती मधील सदनिकाणची विक्री करताना तत्कालीन ग्रामपंचायतीच्या वतीने इमारत बांधकाम आणि दुरुस्तीचा ठराव खरेदी दाराणा दाखवण्यात येत होता. 2016 साली घेण्यात आलेल्या ठरावावेळी सर पंच म्हणून नी. द. म्हात्रे नावाच्या व्यक्तीने ठरवावर सही केल्याचे निदर्शनास येत आहे.मात्र त्या वेळी नी. द. म्हात्रे नावाची कोणतीही व्यक्ती सरपंच नसल्याची माहिती समोर आली असून,सरपंच म्हणून सही करणारी व्यक्ती कोण हा शोध घेणे जरुरीचे झाले आहे.