शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वीज अन् वीजबीलाबाबत CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आर्वी येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. वीजेचं बीलही कमी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शेतीसाठी दिवसा वीज मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
Baramati News: ‘काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, नाहीतर…’;अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेचं बिलही कमी होणार आहे. विजेचे कमी करून दाखवणारं महाराष्ट्र देशातील पाहिलं राज्य ठरलं आहे. राज्यातील ८० टक्के भागात आता लवकरच दिवसा १० तास वीज उपलब्ध करून देण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
५०० मेगा वॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प लोअर वर्धा प्रकल्पावर उभारला जात आहे. नेरी मिर्झापुर गावाला संपूर्ण सौर ऊर्जा देण्यात आली आहे. येत्या काळात संपूर्ण वर्धा जिल्हा सौर उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असल्याचं सांगून नेरी मिर्झापूर ग्रामस्थांच फडणवीसांनी अभिनंदनही केलं आहे. वर्ध्यातील आमदार-खासदारांनी ज्या विविध मागण्या केल्या आहेत, त्यासाठी बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
Maharashtra Politics : मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, प्रवक्त्याने सोडला पक्ष, या पक्षात करणार प्रवेश
राज्यात आणि दुष्काळी भागात विहीर पुनर्भरण योजना राबवण्यात येत आहे. त्याचा फायदा विहिरीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी होणार आहे. तसंच बार्शी उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आली असून शेतीला पाणी उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.