Photo Credit- X@Ajit Pawar 'काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, नाहीतर...';अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या विनोदी स्वभावामुळे आणि वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी बीड दौऱ्यावर युवा संवाद मेळाव्यात बोलताना चुलत्याच्या कृपेने सगळं बरं चाललंय असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळातही त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली होती. यानंतर आता थेट बारामतीत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा,” काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, असं वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.
बारामतीमधील एका रस्त्याच्या कामासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी “काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही,” असं वक्तव्य केलं. अजित पवार म्हणाले, “या रस्त्यांबाबत मी काका कुतवळ यांना सांगितलं आहे की आम्हाला सहकार्य करा, यासोबतच मी तहसीलदार, बीडीओ आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांनाही आदेश दिलेत. मी त्यांना म्हटलं आहे की काकांनाही विश्वासात घ्या, लोकांना विश्वासात घ्या, त्याशिवाय पुढे जाता येत नाही. काका लोक म्हणजे काका कुतवळ यांना… नाहीतर ही माध्यमं लगेच चर्चा सुरू करतात, अजितदादा घसरले.. कोणावर घसरले यावर चर्चा होईल.”
Maharashtra Politics : मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, प्रवक्त्याने सोडला पक्ष, या पक्षात करणार प्रवेश
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी इथं अधिकाऱ्यांना घेऊन येण्यामागे एक कारण आहे. मुंबईत जर कुठला अधिकारी काही बोलला असेल तर मी ठामपणे सांगू शकतो की मी त्या ठिकाणी जाऊन आलोय. तुम्ही एअर कंडिशनमध्ये बसून निर्णय घेऊ नका. पूर्वी या भागात कुणालाही पाणी मिळत नव्हतं. तेव्हा तुम्ही म्हणाले होते की ‘आम्ही जमिनी देतो, आम्हाला पैसे नकोत, फक्त पाणी द्या.’ पण आता मात्र तुम्ही जमिनीचे पैसे मागत आहात. आम्ही आता बंद पद्धतीने पाईपलाइन टाकणार आहोत. जमिनीखाली तीन ते पाच फूट खोलीवर पाईपलाइन जाईल. त्यामुळे त्यावर शेती करणे शक्य होईल,” असंही अजित पवार यांनी पुढे स्पष्ट केलं.
अजित पवार म्हणाले, “जेव्हा मी पहिल्यांदा कृष्णा खोरे महामंडळाचा मंत्री झालो, तेव्हा पुरंदर उपसा योजना राबवली होती. पुरंदर योजनेमुळे आपल्याला बाराही महिने पाणी उपलब्ध होणार आहे. तलावात थेट पाईप टाकू नका, परकुलेशन झालेलं पाणी वापरा. काल छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने आम्ही त्यांना अभिवादन केलं. फुले वाड्यात, जिथे सावित्रीबाई आणि महात्मा फुले वास्तव्यास होते, तिथेही मी भेट दिली. स्मारकासाठी मी महापालिकेला २०० कोटी रुपये दिले आहेत. नवीन नोकरी मिळाल्यानंतर त्या स्मारकाला भेट द्यायलाच हवी.
दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला विटाने मारहाण करून ऐवज लांबवला; पोलिसांना माहिती मिळताच…
काटेवाडीत राहत असताना मी स्वतः शेती करत होतो.पण खासदार झाल्यानंतर मुंबईला गेलो. प्रत्येक आमदाराला ५ वर्षांत २५ कोटी रुपये निधी मिळतो. पण मी १०० दिवसांत दीड हजार कोटींचा निधी आणला होता. जनावरांसाठी डॉक्टर असलेला दवाखाना उपलब्ध करून दिला आहे. एकजण मला म्हणाला, ‘दादा, आमचं कुत्रं आजारी पडलं होतं, आणि त्यावर खूप खर्च झाला.’ मी विचारलं, ‘किती?’ तर तो म्हणाला, ‘दीड लाख रुपये.’ मोठी माणसं असे खर्च करतात,” असंही अजित पवारांनी सांगितलं.