मंत्री मंगल प्रभात लोढा (फोटो- ट्विटर )
मुंबई : ताडदेव येथील वेलिंग्टन हाइट्स इमारतीसंदर्भात कोर्टाने घरे खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर रहिवाशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे रहिवाशांना अखेर न्याय मिळाला आहे. तपासाअंती स्पष्ट झाले की या प्रकरणात रहिवाशांची काहीही चूक नसून बिल्डरकडून गंभीर फसवणूक करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) व संबंधित फाईल रखडलेल्या होत्या.
रहिवाशांवर अन्याय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाई करत जर सर्व बाबींचे अनुपालन व्यवस्थित झाले असेल तर ओसी देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. या निर्णयामुळे वेलिंग्टन हाइट्समधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रसंग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. यावेळी लोढा यांनी सांगितले की, “सामान्य नागरिकांची चूक नसताना त्यांना शिक्षा होणार नाही, याची मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली भूमिका स्तुत्य आहे. याकरिता मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार व्यक्त करतो. जिथे कुठे जनतेवर अन्याय होईल, तिथे जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी देवाभाऊ त्यांच्या सोबत असतील.”
लोढा यांची पोस्ट काय?
ताडदेव, तुळशीवाडी येथील वेलिंग्टन हाइट्स इमारतीला अग्निशमन दलाने घरे खाली करण्यासाठी नोटीस पाठवली होती, या संदर्भात रहिवाशांनी त्यांच्या चिंता व अडचणी माझ्यासमोर मांडल्या. रहिवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, त्यांची समस्या योग्य प्रकारे सोडवली जावी, यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक घेतली.
📍 बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय
ताडदेव, तुळशीवाडी येथील वेलिंग्टन हाइट्स इमारतीला अग्निशमन दलाने घरे खाली करण्यासाठी नोटीस पाठवली होती, या संदर्भात रहिवाशांनी त्यांच्या चिंता व अडचणी माझ्यासमोर मांडल्या.
रहिवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, त्यांची समस्या योग्य प्रकारे… pic.twitter.com/ONwhCHKrmJ
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) August 28, 2025
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मदतीने वेलिंग्टन हाइट्समधील रहिवाशांना न्याय मिळाला, यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो.
बांग्लादेशींवरून लोढांचा रोखठोक सवाल
मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही संस्था पुढाकार घेऊ शकते. कोणतेही शुल्क न आकारता व्यवस्थापनाची तयारी असल्यास परवानगी देण्यात यावी, असे या निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे. या निर्णयानुसार सद्यस्थितीत खाजगी संस्थांच्या सहकार्याने ३० ते ३५ शाळा चालवल्या जात आहेत आणि त्यात मालवणी टाऊनशिप स्कूलचाही समावेश आहे. प्रयास फाउंडेशनच्या पुढाकारामुळे मालवणी भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होत असेल, तर त्याला विरोध का? असा थेट सवाल कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबई महापालिका मालवणी टाऊनशिप स्कूल येथे प्रयास फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.