मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलीसांनी अतिशय चांगली कारवाई केली आहे. नेपाळमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या निलेश चव्हाण याला पोलीसांनी भारताच्या सीमेवरच पकडले आहे. योग्यप्रकारची माहिती प्राप्त करून हा सर्व सापळा रचला गेला. त्यामुळे त्यालाही ताब्यात घेतले गेले असून. या प्रकरणात जेवढे दोषी लोक आहेत त्यापैकी कोणालाही सोडले जाणार नाही. तपासात कुठल्याही प्रकारची हायगय केली जाणार नसून, दोषींना अतिशय कडक शिक्षा झाली पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बालगंधर्व रंगमंदिर येथील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. कारागृह उप महानिरिक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर हगवणे कुटुंबाला शस्त्रपरवाना देण्यात मदत केल्याच्या आरोपावर विचारले असता ते म्हणाले, सुपेकरांबाबत तक्रारी आल्या असल्यामुळे या तक्रारीमध्ये किती तथ्य आहे हे तपासण्यास सांगितले आहे.
कुठल्याही प्रकारे या तपासात कोणी दबाव आणू नये यासाठी आम्ही काही निर्णय घेतले आहेत. दरम्यान गेल्या दोन वर्षात पुण्यात सहाशेहून अधिक शस्त्र परवाने दिले गेले असल्याबाबत विचारले असता त्यांनी, या सर्व परवान्याबाबत चौकशी करण्यात येणार असून, चुकीच्या पध्दतीने परवानगी देणार्यांवर कारवाई करून ते रद्द करण्यात येतील असे सांगितले.
🚩 300 Years of Legacy, A Dialogue for Tomorrow!
‘Yuva Prerna Samvad’ organised on the occasion of the 300th birth anniversary of Punyashlok Ahilyadevi Holkar — an inspiring initiative connecting the youth with ideals of service, leadership, and values.🚩 तीन शतकांची प्रेरणा,… pic.twitter.com/yIvMUi8Zu2
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 30, 2025
लाडकी बहीण योजनेत 2 हजार 600 महिला या सरकारी नोकरीत आहेत यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लाकडी बहीण योजनेच्या निकषात नसलेल्या काही महिलांनी अर्ज करून याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने यात चौकशी करून महिलांना कमी करत आहोत, हे काम लवकरच पुर्ण करण्यात येईल.
वैष्णवी मृत्यू प्रकरणात रूपाली चाकणकरांची महत्वाची प्रतिक्रिया
पोलिसांनी नीलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या आहेत. यावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, “वैष्णवी प्रकरणात ज्यांनी ज्यांनी आरोपीना मदत केली त्यांच्यावर कारवाई झाली आहे. आरोपीला शिक्षा होणे आणि पीडितेला न्याय देणे हीच आमची भूमिका आहे. ”
पुढे बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, “आपल्या सर्वांचे लक्ष हे वैष्णवीला न्याय मिळवून देण्यावर असले पाहिजे. तिच्या आई वाडीलयांसोबत उभे राहण्यावर असले पाहिजे. आरोपीना कठोरात कठोर शिक्षा होईल अशी मला खात्री आहे. पोलिस अत्यंत व्यवस्थितरित्या या गोष्टी तपास करत आहेत.
नीलेश चव्हाणला अटक
पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. तो परराज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. लवकरच त्याला पिंपरी- चिंचवड मध्ये आणले जाणार आहे.