वैष्णवी हगवणे प्रकरणावर रूपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया (फोटो -सोशल मिडिया)
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. हगवणे प्रकरणातून राज्यभरात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान आज वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी फरार असणार्या निलेश चव्हाण याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर त्याच्या शोध पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाष्य केले आहे.
पोलिसांनी नीलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या आहेत. यावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, “वैष्णवी प्रकरणात ज्यांनी ज्यांनी आरोपीना मदत केली त्यांच्यावर कारवाई झाली आहे. आरोपीला शिक्षा होणे आणि पीडितेला न्याय देणे हीच आमची भूमिका आहे. ”
पुढे बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, “आपल्या सर्वांचे लक्ष हे वैष्णवीला न्याय मिळवून देण्यावर असले पाहिजे. तिच्या आई वाडीलयांसोबत उभे राहण्यावर असले पाहिजे. आरोपीना कठोरात कठोर शिक्षा होईल अशी मला खात्री आहे. पोलिस अत्यंत व्यवस्थितरित्या या गोष्टी तपास करत आहेत.
नीलेश चव्हाणला अटक
पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. तो परराज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. लवकरच त्याला पिंपरी- चिंचवड मध्ये आणले जाणार आहे.
वैष्णवी हगवणेला आत्महत्येल प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी सहआरोपी केले आहे. तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला. निलशे चव्हाण हा वैष्णवीची नणंग असलेल्या करिष्मा हगवणेचा मित्र आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण गेल्या १० दिवसांपासून फरार होता. नीलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्याचे चार विभाग आणि पुणे पोलिस ठाण्याचे तीन विभाग राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्ये तपास करत होते. अखेर, निलेश चव्हाणला अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे.
निलेश चव्हाण बांधकाम व्यवसायात असून तो पोकलेन मशीनच्या व्यवसायातही सक्रिय आहे. त्यामुळे शशांक हा हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र म्हणून ओळखला जातो. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक संबंधांमध्ये निलेश अनेकदा सहभागी होता. १४ जून २०२२ रोजी पत्नीच्या तक्रारीवरून निलेश चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात निलेश आणि त्याचे काही नातेवाईक आरोपी होते. पुणे सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळूनही, वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामिन मंजूर केला होता. पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर पार्क सोसायटीमध्ये निलेश चव्हाणच्या वडिलांच्या नावे तीन फ्लॅट असल्याची माहिती आहे.