मुख्यमंत्र्यांनी कोणाला टोला लगावला? (फोटो सौजन्य-X)
निवडणुकांना अखेरचे काहीच दिवस शिल्लक असताना सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आज (5 नोव्हेंबर) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील कोल्हापुरात महायुतीच्या सभेसाठी उपस्थित आहेत. त्याचवेळी शिवसेना उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे देखील कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अंबाबाईचे दर्शन घेऊन ते आदमापुर या ठिकाणी आपली जाहीर सभा घेणार आहेत. तर मुख्यमंत्री हे सुरुवातीला पट्टणकोडोली आणि शिरोळ या ठिकाणी सभा घेतली. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होती.
‘शिवसेना आणि धनुष्यबाण ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही,’ असे सांगत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सोमवारी हल्लाबोल केला होता. त्याला एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. “बाळासाहेबांचा गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही मुक्त केला. आम्ही घरात बसून नाही तर लोकांच्या दारांत, बांधावर जात आहोत. घरात बसून नाही तर लोकांच्या दारात जाऊन आम्ही काम करतोय,” असा टोला त्यांनी लगावला. महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
हे सुद्धा वाचा: “बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा…”, उद्धव ठाकरेंची ‘या’ 5 बड्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई
एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीने आपल्या सर्व बंडखोरांना रोखण्यात यश मिळवले आहे, तर अनेक ठिकाणी बंडखोर अजूनही सक्रिय आहेत. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ते माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे सदा सरवणकर यांना निवडणुकीतून हटवण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यासाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये करारही झाला होता. माहीमच्या जागेवर एकनाथ शिंदे सेना अमित ठाकरे यांना वॉकओव्हर देईल आणि त्याबदल्यात मनसे १० जागांवर उमेदवार मागे घेईल, असे मान्य करण्यात आले. यासाठी सरवणकर यांची मनधरणी करण्यासाठी स्वत: एकनाथ शिंदे नेहमीच सक्रिय होते. 15 वर्षांचे आमदार सदा सरवणकर सुरुवातीला तयार नव्हते आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी खऱ्या शिवसैनिकाला कुटुंबासाठी बलिदान द्यायला सांगितले नसते, अशी भावनिक पोस्ट लिहिली.
त्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच त्यांची मनधरणी केल्याचे बोलले जात आहे. पक्ष जिंकल्यास त्यांना विधानपरिषदेवर पाठवले जाईल आणि सरकारमध्ये मंत्रीही होईल, असे आश्वासन दिले होते. अशातच त्यांनी अखेरच्या दिवशी होकार देत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्या घरी ‘शिवतीर्थ’ येथे जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र प्रदीर्घ प्रतिक्षेनंतरही राज ठाकरेंनी त्यांना भेटण्यास नकार दिला. आता सदा सरवणकर म्हणतात की, राज ठाकरेंनी मला भेटण्यास नकार दिला. त्यामुळे मी आनंदी नाही. अशातच आता माहीममध्ये अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि उद्धव सेनेचे महेश सावंत यांच्यात तिहेरी लढत होण्याची स्थिती आहे.
एवढेच नाही तर आता 10 जागांवरून उमेदवार मागे घेण्याची मनसेची योजनाही फोल ठरली आहे. अशाप्रकारे मुंबई विभागातील 10 जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राहणार असून त्यामुळे महायुतीचे थेट नुकसान झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान माहीम मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्यास झालेल्या विलंबामुळे राज ठाकरे संतप्त झाल्याचे समजते. याशिवाय एक ऐवजी 10 जागा देण्याच्या निर्णयाने चुकीचा संदेश जाईल, असेही त्यांना वाटत होते. राज ठाकरेंनी आपल्या मुलाचा विजय निश्चित करण्यासाठी तडजोड केल्याचा संदेश जाईल. अशा स्थितीत त्यांनी अखेरच्या क्षणी करार मोडला.
हे सुद्धा वाचा: कोल्हापूरात होणार राडा? मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंची शिवसेना आजपासून प्रचाराचा करणार शुभारंभ