मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंची शिवसेना आजपासून प्रचाराचा करणार शुभारंभ (फोटो सौजन्य-X)
विधानसभा निवडणुकीला अवघे 15 दिवस उरले आहेत. अशातच पक्षांकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची उमेदवारी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आजपासून (5 नोव्हेंबर) रिंगणात उतरणार आहेत. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन उद्धव ठाकरे निवडणूक प्रचाराला सुरुवात करत असून या माध्यमातून कोकण आणि विदर्भातील जागा जिंकण्याची रणनीती मानली जात आहे.
2022 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा मतदारसंघ उद्धव यांच्या अजेंड्यावर आहे. आता दोन वर्षांनंतर उद्धव यांनी थेट त्यांच्याच भागात रॅली काढून स्कोर सेट करण्याचा डाव आखला आहे. याचदरम्यान आता दोन्ही शिवसेनेचे प्रमुख नेते कोल्हापुरातून प्रचाराला सुरूवात करणार आहेत. दोन्ही नेते एकाच दिवशी अंबाबाईचे दर्शन घेऊन जाहीर सभा घेणार आहेत. एकंदरित पाहता कोल्हापूरात आज राडा होणार की काय? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 साली कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या प्रचाराचा शुभारं करवीर निवसिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
याच दिवशी कोल्हापूर शिवसेनेच्या गटांचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज (५ नोव्हेंबरला) कोल्हापुरात प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेते अंबाबाईचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी नरळ फोडून जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे आज कोल्हापुरात राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याच्या स्थिनीनंतर ही त्यांची पहिली सार्वजनिक सभा असणार आहे. अँजिओप्लास्टीनंतर त्यांनी मातोश्रीवर विश्रांती घेतली होती. परंतु आता ते कोल्हापुरात प्रचारात सहभाग होतील. कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. त्यात काही माजी आमदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केल्यामुळे हा प्रचार त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
दुसरीकडे तपोवन मैदानावर आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. कोल्हापूर प्रचारादरम्यान शिंदे गट आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाची चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सतेज पाटील यांनी काही सकारात्मक कायदा आणला असता. त्यामुळे कोल्हापूरचे वातावरण कमालीचे तापलेले आहे.
भायखळा, माहीम, जोगेश्वरी पूर्व, मागाठाणे, कुर्ला, विक्रोळी, दिंडोशी, चेंबूर, अंधेरी पूर्व, भांडुप, शिवरी, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण आणि ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक ही निर्णायक लढाई, अस्तित्वाची लढाई आणि खरी शिवसेना कोण हे ठरवण्याची लढाई अपेक्षित आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरून शिंदे छावणीतील नेत्यांना खुले आव्हान देण्याची रणनीती आखली आहे. अशा परिस्थितीत चेकमेटच्या खेळात कोण कोणावर मात करतो हे पाहावे लागेल.
हे सुद्धा वाचा: संजय राऊत यांच्या भावाच्या विरोधात FIR दाखल,शिंदेंसेनेच्या उमेदवाराबद्दलचं वक्तव्य भोवलं!