मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत किशोरी पेडणेकरांवर हल्ला चढवला. केवळ एक प्रकरण नाही, तर एसआरएच्या अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचं किरीट सोमय्या म्हंटल आहे. तसेच SRA घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी किशोरी पेडणेकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांची चौकशी केली गेली नाही असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनि केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यासंदर्भात आज सोमय्यांनी कागदपत्रं जमा केली. पेडणेकर यांनी कोविड काळात घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. सोमय्या यांनी या विषयावर प्रसारमाध्यमांशी पत्रकार परिषदेत संवाद साधला.
एसआरए घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार केली होती, पण उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी झाली नाही, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी या प्रकरणात आरोप केला आहे की, ठाकरे सरकारला पुरावे दिले होते, मात्र ठाकरे यांच्या सीएमओकडून दबाव आल्यानं घोटाळ्याची चौकशी झाली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणं झाल्याचंही सोमय्यांनी सांगितलं आहे. किशोरी पेडणकर यांच्यावर सोमय्यांनी तक्रार दाखल केली असून पेडणेकरांवर सहा ठिकाणी तक्रार दाखल असल्याची माहिती सोमय्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयानं तक्रारीची दखल घेतल्याचं सोमय्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे, एसआरएनं चौकशी सुरु केली आहे, असं सोमय्यांनी म्हटलं, शिवाय एसआरएच्या सीईओंशी बोलल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर किशोरी पेडणेरकर यांनी घोटाळा करून पैस कमवत बेनामी संपत्ती कमवल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच दिवंगत भावाच्या नावावर किशोरी पेडणेकर यांनी फसवणूक केल्याचा आरोपही सोमय्यांनी केलाय.
पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आणखी एका एसआरए घोटाळ्याप्रकरणी कागदपत्रं माध्यमांसमोर आणली. गोमातानगर एसआरए प्रकल्पात पेडणेकर यांचे गाळे असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर पेडणेकर यांनी काल पत्रकारांसह गोमाता नगरमध्ये जाऊन आपला गाळा असेल तर टाळे ठोकेन असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर दादरमधील एका एसआरए प्रकल्पाबाबत पोलीस पेडणेकर यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी पोलीस पेडणेकर यांना आज चौकशीसाठी पुन्हा समन्स धाडलं आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी पेडणेकरांविरोधात एसआरए घोटाळ्याची कागदपत्रं माध्यमांसमोर सादर करून खळबळ उडवून दिली आहे.