संग्रहित फोटो
महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असून, उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी मागणी केली आहे. दोन दिवसापूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले होते त्यानुसार सोलापूरसाठी ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाने दिली आहे.
उमेदवारांची नावे
प्रभाग क्रमांक 9 मध्ये दत्तु नागप्पा बंदपट्टे, प्रभाग 14 मध्ये शोएब महागामी, बागवान नसिम खलीफा, प्रभाग 16 मध्ये फिरदौस पटेल, सीमा यलगुलवार, नरसिंग कोळी, प्रभाग 20 मध्ये अनुराधा काटकर, प्रभाग 22 मध्ये संजय हेमगड्डी, राजंनंदा गणेश डोंगरे, प्रभाग 23 मध्ये दीपाली सागर शहा, प्रभाग 11 मध्ये धोंडप्पा तोरनगी, प्रभाग 15 मध्ये सबा परवीन आरिफ शेख, चेतन नरोटे, मनीष नितीन व्यवहारे, प्रभाग 17 मध्ये शुभांगी विश्वजीत लिंगराज, परशुराम छोटूसिंग सातारवाले, वाहिद अब्दुल विजापुरे, प्रभाग 21 मध्ये किरण शीतल कुमार टेकाळे, रियाज हुंडेकरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही काँग्रेसमध्ये दाखल झाले. यावेळी प्रशांत जगताप यांना महाराष्ट्राच्या विचारधारेचे प्रतीक म्हणून “कोण होता शिवाजी?” हे पुस्तक भेट देण्यात आले. या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी भाजपच्या वचनपूर्ती न करण्याच्या धोरणावर टीका करत महाराष्ट्राच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा उपस्थित केला. या पक्षप्रवेशावेळी “प्रशांत दादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है” आणि “काँग्रेस पक्षाचा विजय असो” यांसारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.






