मुंबई – कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा (Belgaum, Karwar, Nipani) एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या काही गावांवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला असून, परिणामी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे.
[read_also content=”छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे भाजपाचे नियोजित षडयंत्र – नाना पटोले https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-planned-conspiracy-to-insult-chhatrapati-shivaji-maharaj-nana-patole-351070.html”]
दरम्यान, हा सीमावाद सध्या कोर्टाच्या कचाट्यात आहे, दोन्ही राज्यातील प्रश्न सर्वोच्य न्यायालयात प्रलंबित आहे. हा वाद सुटावा असं दोन्ही राज्याना वाटत आहे. पण तिढा सुटत नाहीय, यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी एक मोठं विधान केलं आहे. सीमावादाच्या खटल्यामध्ये महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयासमोर अतिशय ताकदीने बाजू मांडली आहे. आपल्याला यात न्याय मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच यामुळं याबाबत विनाकारण नव्याने कुठलाही वाद निर्माण करणं योग्य ठरणार नाही. तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, सीमाप्रश्नी महाराष्ट्रही निर्णय घेऊ शकत नाही. आणि कर्नाटकही निर्णय घेऊ शकत नाही. तर याबाबतचा अंतिम निर्णय हा सर्वोच्च न्यायालय देणार आहे. असं फडणवीस यांनी म्हटले.