देशभरात १४ वर्षीय मुलींसाठी विशेष HPV लसीकरण मोहीम! गर्भशयाचा कॅन्सर झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसतात 'ही' लक्षणे
गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची कारणे?
१४ वर्षीय मुलींना का दिली जाणार लस?
लसीकरणाचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम?
भारतासोबतच जगभरातील सर्वच देशांमध्ये कॅन्सर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शरीराला कॅन्सरची लागण झाल्यानंतर गंभीर लक्षणे दिसून येतात. महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. हे वाढते धोके लक्षात घेऊन क्रेंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे. लवकरच क्रेंद्र सरकारकडून देशभरातील १४ वर्षीय मुलींसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत मुलींना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. ही लस कॅन्सरविरुद्ध लढण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते. भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. आकडेवारीनुसार, भारतात महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय दरवर्षी १.२५ लाख महिलांना गर्भाशयाच्या कॅन्सरची लागण होते. तर ७५,००० महिलांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे कमीत वयात घेतलेली कॅन्सर प्रतिबंधामक लस शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.(फोटो सौजन्य – istock)
‘इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दरवर्षी १४ वर्षे पूर्ण करणाऱ्या सुमारे १.१५ कोटी मुलींना लस दिली जाणार आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १४ वर्षे हे वय लसीकरणासाठी योग्य आहे. या वयात लस घेतल्यास शरीरात दीर्घकाळ आणि सर्वाधिक रोगप्रतिकारक शक्ती कायम टिकून राहते. गर्भाशय मुखाचा कॅन्सर HPV विषाणूच्या संसर्गामुळे होतो. हा विषाणूच्या अनियंत्रित पेशी शरीरात वाढू लागतात. त्यानंतर त्यांचे रूपांतर कॅन्सरमध्ये होते. असुरक्षित शारीरिक संबंध, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, धूम्रपान आणि अनुवांशिक इत्यादी कारणामुळे सुद्धा गर्भाशयाचा कॅन्सर वाढण्याची शक्यता असते. हा आजार वाढू लागल्यानंतर हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतो.
मासिक पाळीच्या चक्राव्यतिरिक्त अंगावरून पांढरे पाणी जाणे
दोन मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होणे.
शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे.
रजोनिवृत्ती नंतरही रक्तस्त्राव होणे.
ओटीपोटात किंवा पोटाच्या खालच्या भागात सतत वेदना
वारंवार लघवी होणे
वजन अचानक कमी होणे
शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ नये म्हणून आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वयाच्या ४० व्या वर्षानंतर शरीरसंबंधित विविध चाचण्या कराव्यात. यामुळे आजाराचे योग्य वेळी निदान होऊन उपचार करता येईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘पॅप स्मीयर’ आणि HPV टेस्ट कराव्यात. तसेच शारीरिक संबंध ठेवताना योग्य ती काळजी घ्यावी. तसेच सर्वच महिलांनी शरीरात दिसुन येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
Ans: हा कर्करोग प्रामुख्याने मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) च्या उच्च-जोखीम प्रकारांच्या सततच्या संसर्गामुळे होतो.
Ans: गर्भाशयाच्या मुखाच्या पेशींची तपासणी, HPV विषाणूची उपस्थिती तपासणे.
Ans: होय, जर सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले, तर शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी किंवा केमोथेरपीद्वारे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.






