दौंड: दौंड रेल्वे स्टेशनमध्ये सोलापूर विभाग व एन डी आर एफ (१० बटालियन) तीम यांच्यावतीने दौंड स्थानकावर युद्दाभ्यासाचे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) करण्यात आले. सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर रेल व्यवस्थापक अप्पर मंडल , शैलेंद्र परिहार आणि पुण्याचे अप्पर मंडल रेल व्यवस्थापक बी के सिंह आणि एनडीआरएफ जस्टिन यांच्या देखरेखे खाली आयोजित करण्यात आले होते.