सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवार आणि सोलापूरच्या माढा तालुक्याती डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांच्यात झालेली बातचीत व्हिडीओत कैद झाली असून तोच व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे त्या महिला पोलिस अधिकाऱ्याला खडी उत्खनन तात्काळ थांबवण्यास सांगत आहेत. आदेशांचे पालन न केल्याबद्दल कारवाई करू असे ते धमकीच्या स्वरात बोलतानाही दिसले. 1 सप्टेंबरची ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. यावरुन विरोधकांनी अजित पवारांवर निशाणा साधवला आहे. या प्रकरणावरुन अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार यांचं स्पष्टीकरण
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पवार म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 5, 2025
नेमकं प्रकरण काय?
सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये मुरूम उपसा होत असल्याची तक्रार समोर आली. तहसील अधिकारी आणि डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांना ही तक्रार मिळताच, पोलील दल घेऊन त्या कारवाई करण्यासाठी तेथे पोहोचल्या. प्रशासनाची कारवाई सुरू असताना, राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ता बाबा जगताप यांनी त्यांच्या फोनवरून थेट अजित पवारांना फोन करत त्यांचं अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अंजली कृष्णा यांनी अजित पवारांशी संवाद साधला. त्या फोनवर अजित पवार म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय, तुम्ही तुमची कारवाई थांबवा आणि तिथून निघून जा, असे आदेश त्यांनी दिले. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन केला होता असे तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा. मुंबईतील वातावरण खराब आहे आणि आपल्याला तिथे प्राधान्य द्यावे लागेल. मी तुम्हाला कारवाई तात्काळ थांबवण्याचा आदेश देतो, असे त्यांनी सांगितलं.
मात्र त्या बोलण्यादरम्यान पोलिस उपअधीक्षक अंजना कृष्णा म्हणाल्या की मला कसं कळणार की तुम्हीच बोलत आहात. असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना व्हिडिओ कॉल करून त्यांची ओळख पटवण्याची, पडताळणी करण्याची मगाणी केली. ते ऐकून अजित दादा भडकले. तुम्ही मला कॉल करायला सांगताय ? तुमच्यावर अॅक्शन घेईन अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यावर अंजली कृष्णा म्हणाल्या की मी तुमचं बोलणं समजू कते. त्यानंतर अंजली यांनी नंबर दिल्यावर अजित पवार यांनी त्या नंबरवर व्हिडीओ कॉल केला. माझा चेहरा तर तुम्ही ओळखत असाल ना, तुमची डेअरिंग खूपच वाढली आहे, असंही अजित पवारांनी सुनावलं. फोनवर बोलताना अजित पवारांनी डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांना कारवाई थांबवून तेथून निघून जाण्यास सांगितलं.