• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Devendra Fadnavis On Rapid Redevelopment Is Necessary For A Slum Free Mumbai

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

स्लम-फ्री मुंबईचे स्वप्न साकार होईल. तसेच नव्या कल्पना, नवे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून हे परिवर्तन साध्य होऊ शकत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 15, 2025 | 01:44 PM
झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती (फोटो सौजन्य- x)

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती (फोटो सौजन्य- x)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मुंबई स्लम-फ्री करायची असेल, पुनर्विकास जलद करायचा असेल, तर आपल्याला दशकानुदशके चालणारे प्रकल्प नकोत. प्रकल्प सुरू करून वर्ष-सव्वावर्षात प्लॉट तयार करून पुढील एका वर्षात पुनर्वसन इमारत उभी करावी, तरच स्लम-फ्री मुंबईचे स्वप्न साकार होईल. तसेच नव्या कल्पना, नवे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या दृष्टिकोनातून हे परिवर्तन साध्य होऊ शकत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष म्हणून सुखराज नाहर यांनी कार्यभार स्वीकारला. यावेळी झालेल्या क्रेडाई-एमसीएचआय आयोजित ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. सध्या मुंबईत पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासाचा पहिला टप्पा लोकांना सुपूर्द केला आहे. यामध्ये जवळपास १०० वर्षं १६१ चौ. फूट घरात राहणाऱ्यांना आता ५०० चौ. फूट जागा मिळत आहे. हा आशियातील सर्वात मोठा शहरी पुनर्विकास प्रकल्प आहे. मुंबईत पुनर्विकासाबरोबरच स्लम पुनर्विकास हा दुसरा मोठा संधीचा मार्ग आहे. तसेच क्लस्टर डेव्हलपमेंट देखील नवीन संधी निर्माण करत आहे. आज मुंबईत जगातील सर्वोत्तम वास्तुकला, आयकॉनिक इमारती, उत्कृष्ट सुविधा दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात’; शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरात तीव्र आंदोलन

तसेच जगभरात उपलब्ध असलेली नवीन तंत्रज्ञान मुंबईत आणायला हवीत. आज बांधकाम क्षेत्रात अशा तंत्रज्ञानामुळे ८० मजली इमारत केवळ १२० दिवसांत बांधली जाऊ शकते. आज मुंबईत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधेची कामे सुरू आहेत. सध्या बांद्रा–वर्सोवा सी-लिंक प्रकल्प ६० टक्के पूर्ण झाला आहे आणि पुढील दोन वर्षांत तो पूर्ण होईल. यासोबत सी-लिंकला दहिसरपर्यंत आणि नंतर भाईंदरपर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर वेस्टर्न एक्सप्रेस-वे हा मुंबईतील ६० टक्के वाहतूक उचलत आहे. त्याला समांतर अशी जोडणी सी-लिंकपासून भायंदर -विरारपर्यंत तयार होत असून तो पुढे वाढवण पोर्टपर्यंत करण्यात येणार आहे. या सर्वामुळे उत्तरेकडील संपूर्ण भाग रिअल इस्टेट उद्योगासाठी खुला होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्र हे रेरा लागू करणारे पहिले राज्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एमसीएचआयने दिलेल्या अनेक योग्य सूचनांमुळे आम्ही रेरा कायद्यामध्ये सुधारणा केल्या आणि रेरा कायदा अधिक कार्यक्षम बनवला. रेरा लागू झाल्यामुळे लोकांचा रिअल इस्टेट उद्योगावरचा विश्वास वाढला आहे. रेरा अस्तित्वात आल्यानंतर क्रेडाई एमसीएचआयने दरवर्षी प्रदर्शन आयोजित करण्याची परंपरा सुरू केली, ज्यामध्ये नियामक, वित्तीय संस्था आणि रिअल इस्टेट क्षेत्र एकत्र येतात, त्यामुळे ग्राहकांना विश्वासार्ह व्यवहाराची संधी मिळते. मुंबईत एमसीएचआयचे प्रदर्शन हे देशातील सर्वोत्तम प्रदर्शनांपैकी एक असून यामुळे ग्राहकांशी नातेसंबंध अधिक घट्ट झाले असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. मुंबईसाठी नवीन विकास आराखडा तयार करतेवेळी मुंबईच्या विविधतेमुळे आणि किनारपट्टीवरील शहर असल्याने येथे सीआरझेड, लष्कर, नौदल, वन विभाग अशा अनेक नियमांचा प्रभाव आहे. या सर्व अडचणींमधून एक विकास आराखडा तयार करणे आवश्यक होते. यामध्ये संपूर्ण उद्योगक्षेत्र एकत्र आले आणि क्रेडाई-एमसीएचआयने या प्रक्रियेत अग्रणी भूमिका बजावली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अटल सेतूमुळे तिसरी मुंबई उभारण्याची संधी खुली झाली आहे. तिसऱ्या मुंबईत एज्यु सिटी उभारण्यात येणार आहे. ही नवीन मुंबई विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर असेल. केंद्र सरकारने परदेशी विद्यापीठांना भारतात येण्याची परवानगी दिल्यामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण येथे देता येणार आहे. येथे ३०० एकर जमिनीवर जगातील सर्वोच्च १२ विद्यापीठांना वसवण्याची योजना असून त्यांना जमिन आणि काही सामायिक पायाभूत सुविधा शासनाकडून दिल्या जातील. आज सात विद्यापीठांशी सामंजस्य करार झाले आहेत, त्यापैकी काही विद्यापीठ आपली कॅम्पसेस सुरू करत आहेत. एकूण एक लाख निवासी विद्यार्थी येथे राहतील, त्यामुळे येथे प्रचंड आर्थिक आणि सामाजिक चैतन्य निर्माण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जनसुरक्षा कायद्यावरुन काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवर साधला निशाणा

Web Title: Devendra fadnavis on rapid redevelopment is necessary for a slum free mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 01:44 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन
1

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
2

Maharashtra Rain Update : नागरिकांनो सतर्क राहा! ढगफुटी अन् मुसळधार पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

Mumbai Crime News: घरात एकटं असतांना पोलीस हवालदाराने संपवले आयुष्य, एकटेपणा आणि आजारापासून त्रस्त
3

Mumbai Crime News: घरात एकटं असतांना पोलीस हवालदाराने संपवले आयुष्य, एकटेपणा आणि आजारापासून त्रस्त

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार
4

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

Rajasthan Crime : निळ्या ड्रममधील किलर पत्नीचा पर्दाफाश, रीलबाज लक्ष्मी आणि प्रियकराला पोलिसांकडून अटक

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुर्दशेविरोधात नागरिकांचा जनआक्रोश

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुर्दशेविरोधात नागरिकांचा जनआक्रोश

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी

लाटा पाहण्याच्या मोहापाई लोक अडचणीत येतात….: तुफान पावसामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी केले आवाहन

लाटा पाहण्याच्या मोहापाई लोक अडचणीत येतात….: तुफान पावसामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी केले आवाहन

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.