बीड प्रकरणात उज्वल निकम- देवेंद्र फडणवीस यांची भेट (फोटो- टीम नवराष्ट्र)
बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यभरात चांगलेच तापले आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. कोर्टाने त्याला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केली जावई अशी मागणी देशमुख कुटुंबांकडून होत आहे. दरम्यान आज उज्वल निकम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. फडणवीस-निकम भेटीवर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख कुटुंब आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती झाली पाहिजे. आमच्या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती व्हावी. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उज्वल निकम यांची भेट झाली आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस हे उज्वल निकम यांना या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्त करतील असे वाटत आहे.
तुरुंगात असतानाच आरोपी विष्णू चाटेने ‘ती’ विनंती केली अन् मान्यही झाली
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आठ आरोपींपैकी 7 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत, तर एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून ओळखला जाणारा विष्णू चाटे याला गेवराई इथल्या कोठडीत ठेवण्यात आले. मात्र, विष्णू चाटे याने न्यायालयाकडं मला लातूर कारागृहात ठेवावं, अशी मागणी केली. त्यामुळे न्यायालयानं विष्णू चाटेची लातूर कारागृहात रवानगी केली आहे.
हेही वाचा: Santosh Deshmukh Case : तुरुंगात असतानाच आरोपी विष्णू चाटेने ‘ती’ विनंती केली अन् मान्यही झाली
एकीकडे बीड जिल्ह्यात कृष्णा आंधळे याला अटक करा, या मागणीसाठी आंदोलने केली जात आहेत. खंडणी प्रकरणात विष्णू चाटे याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला गेवराई इथल्या कारागृहात ठेवण्यात आले. मात्र, त्यानंतर वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर आता या घटनेत मोठा खुलासा झाला आहे. खंडणी प्रकरणातील आरोप विष्णू चाटे यानं आपल्याला लातूर कारागृहात ठेवण्यात यावं, यासाठी विनंती अर्ज दाखल केला. त्यामुळे त्याला लातूर इथल्या कारागृहात हलवण्यात आले आहे. उर्वरित 6 आरोपी हे गेवराई इथल्या कोठडीतच ठेवण्यात आले.
5 आरोपी गेवराई कोठडीत
सोनवणे, महेश केदार, सुधीर सांगळे हे आरोपी गेवराई इथल्या कोठडीत ठेवण्यात आले आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक असलेला वाल्मिक कराड याच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनं मोर्चे होताना पाहायला मिळत आहेत.