नाशिक- विधान परिषदेच्या नाशिक पदवधीर मतदारसंघासाठीची निवडमूक चांगलीच चुरशीची होते आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवार आणि ठाकरे गटाच्या पाठिंबा मिळवलेल्या शुभांगी पाटील या सकाळपासून नॉट रिचेबल होत्या. तीन वाजता अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर त्या नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात प्रगटल्या. दरम्यानच्चया काळात मविआच्या उमेदवारीवर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे शिवसेना संपर्क प्रमुख सुभाष जंगले यांनी दावा केला आहे. नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांनी जंगले यांच्या बाजूने कौल दिल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं आता मविआची उमेदवारी नेमकी कुणाला याबाबत संभ्रम आहे. आयुक्तालयात आलेल्या शुभांगी पाटील यांनी मविआचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलंय.
मविआच्या पाठिंब्याचे प्रयत्न सुरु
अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मातोश्रीवर जाऊन शुभांजी पाटील यांनी उद्धव ठआकेरंची भेटट घेतली होती. या भेटीत त्यांना ठाकरे गटानं पाठिंबा दिल्याचं त्यांचं म्हणणय. तसचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्या पक्षातील वरिष्ठांशी चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी सांगतिलंय. भाजपाकडून ही निवडणूक लढवण्यासाठी त्या उत्सुक होत्या. मात्र भाजपानं कुणालाही या मतदारसंघात ए बी फॉर्म दिले नाहीत. तर काँग्रेसकडून सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तांबेंना भाजपा पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे.
भाजपाने विचार करु असे सांगितले होते- पाटील
३ महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी पक्ष आपल्या नावाचा विचार केरल, असं भाजपातर्फे सांगण्यात आलं होतं, असं शुभांगी पाटील यांनी सांगीतलय. तर नाशिकमध्ये ठाण मांडून बसलेले गिरीश महाजन यांनी मात्र पक्ष प्रवेशावेळी असं कोणतंही आश्वासन शुभांगी पाटील यांना देण्यात आलं नसल्याचं आधी स्पष्ट केलेलं आहे. भाजपाने आपला विचार केला नाही, यावर त्यांनी थोडी नारजीही व्यक्त केली. काम करणाऱ्या व्यक्तीचा वेगळा विचार भाजपानं केला असेल असंही पाटील म्हणाल्या.
नॉट रिचेबल का झाले याचंही दिलं उत्तर
राजकारणात अनेक बाबी असतात. अनेककदा काही गोष्टी कराव्या लागतात, असं शुभांगी पाटील यांनी सांगितलंय. भाजपाकडून अर्ज मागे घेण्यासाठी संपर्क करण्यात आला होता का, यावर हात जोडत हे त्यांनाच विचार, आपण यावर काहीही भाष्य करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आत्ता नॉ रिचेबल का झाले हे सांगणार नाही, वेळ आल्यावंर सांगीन असंही पाटील म्हणाल्या.