मुंबई : सध्या लोकसभेचे वारे देशभर वाहत आहेत. निवडणूका जवळ आल्यामुळे आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. आता देशामध्ये गांधी विरुद्ध आंबेडकर अशी लढत होताना दिसत आहे. महाविकास आघाडीसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे नारा दिला. महाराष्ट्रातील 20 हून अधिक जागेवर उमेदवार जाहीर करत प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यावर आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी तीव्र भूमिका घेतली आहे. ‘प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेने तर भाजपलाच फायदा होणार आहे ना असे म्हणत वंचित आणि MIM ला मतदान करू नका’ असं आवाहन तुषार गांधी यांनी केलं आहे. त्यामुळे आता आंबेडकर विरुद्ध गांधी असा वाद पेटण्याची शक्यता आहे.
तुषार गांधी नक्की काय म्हणाले?
देशभरामध्ये एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत रंगणार आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत युती नाकारल्यामुळे ते इंडिया आघाडीमध्ये देखील सामील झालेले नाहीत. या राजकीय पार्श्वभूमीवर तुषार गांधी यांनी मत व्यक्त केले आहे. तुषार गांधी म्हणाले, “भाजपाच्या युतीला गद्दारांची युती म्हटले पाहीजे. या गद्दाराच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय झाला पाहीजे. यासाठी एमआयएम (MIM) आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये, “ असे आवाहन तुषार गांधी यांनी केले.
तसेच “प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी मैत्रीभाव आहे. पण त्यांचा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून त्यांनी एकत्र यायला हवं होतं. त्यांच्या भूमिकेने तर न तर भाजपलाच फायदा होणार आहे ना, त्यामुळे ते टीकेस पात्र आहेत. ही लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे, संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. महाविकास आघाडीला मतदान करा असं आम्ही सांगणार आहोत असे म्हणत वंचित आणि MIM ला मतदान करू नका” असे आवाहन तुषार गांधी यांना केले आहे.