डोंबिवली : आज आदित्य ठाकरे यांनी डोंबिवलीमध्ये उपस्थिती दर्शवली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधंला आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी ते महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्याविषयी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, इथून एक सर्वसाधारण नागरिक उमेदवार म्हणून दिला आहे. काम तर सगळ्यांना आधीच माहिती आहे आज आपण इथे पाहतोय जनता रस्त्यावर आलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आली आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
पक्ष फोडीवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
लोक फोडण्याचा, पक्ष फोडण्याचा, परिवार फोडण्याचा आपण पाहतोय. महायुती भाजप किंवा भाजपाचे मित्र पक्ष एनडीए मध्ये जे आहेत त्यांचं काम सुरूच आहे. महाविकास आघाडी ही जनतेच्या हिताचे बोलत आलेली आहे महाराष्ट्राच्या हिताचे बोलत राहू.
खासदार श्रीकांत शिंदेंवर घणाघाती टीका
श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, श्रीकांत शिंदे यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका त्यांची लायकी तेवढीच आहे. अनेकदा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देऊन त्यांनी समोर येऊन बसावं. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये का पाठवले, महाराष्ट्राचा विकास दोन वर्ष काढलेला आहे त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डेबिट करावे त्यांच्यात ती हिंमत नाही त्यामुळे इकडून तिकडून चिंधीचोर आमच्यावर बोलायला पाठवत असतात.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, आता धार्मिक यांच्यावर भाजपा बोलायला लागली आहे. पहिला इंडिकेटर हाच असतो जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागते तेव्हा हिंदू मुस्लिम असे विषय घेऊन आपल्या तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. धर्माधर्मात असो किंवा जातीमध्ये असो महाराष्ट्र म्हणून आम्ही सगळे एकत्रित आहोत. महाराष्ट्राच्या हिताचे आज जर आम्ही बोललो नाही तर महाराष्ट्राचे मंत्रालय सुद्धा भाजपा, गुजरातला नेऊन ठेवेल अशी टीका आदित्य ठाकरेंनी सरकार केली आहे.
भाजप त्यांचा प्रचार करून गेली आहे त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेलेत निवडणूक आयोग निवडणूक बाद करणार आहे की नाही हा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केलेल्या शरद पवारांच्या टीकेला आदित्य ठाकरे म्हणाले की, हे अतिशय दुर्दैवी आहे एक व्यक्ती ज्यांनी महाराष्ट्रासाठी एवढं काम केलं आहे वयोमानानुसार जरी पकडलं तरी असं कोणाबद्दल बोलणं चुकीचं आहे.