मुंबई : वर्षानुवर्षे अमली पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या बंटी आणि बबलीला मुंबई दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीसीपी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 295 ग्रॅम हेरॉईन जप्त केले असून, त्याची किंमत 35 लाख 40 हजार एवढी आहे. या घटनेमुळे परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणारे सक्रीय असल्याची बाब समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पती-पत्नी दहिसरच्या अंबावाडी परिसरात राहतात, दोघेही ड्रग्जची खरेदी आणि विक्री करण्याचे काम करतात. त्यांच्यावर यापूर्वीही अंमली पदार्थांची विक्री केल्याचा आरोप आहे. झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांना दहिसर परिसरात काही लोक ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीसी पथकाने दहिसरच्या अंबावाडी जंक्शन पुष्प विहार कॉलनी, दहिसर पूर्व येथे छापा टाकला, त्यामध्ये जमीर बाबू मुजावर (37) आणि फरजाना जमीर मुजावर (31) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे 295 दारू आढळून आली. तसेच त्यांच्या घरातून ३५ लाख ४० हजार किमतीची हिरोईन जप्त करण्यात आलं आहे.
[read_also content=”घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ, प्रति सिलेंडर 999.50 रुपये किंमत https://www.navarashtra.com/india/re-increase-in-price-of-domestic-lpg-cylinder-at-rs-999-50-per-cylinder-nrps-277068.html”]
पती-पत्नी दोघेही अनेक दिवसांपासून अमली पदार्थाचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. दहिसर पोलिसांनी भादंवि कलम 8 अ, 29 अ आणि एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करून दोघांना अटक केली आहे. ज्यांना न्यायालयाने 11 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दहिसर पोलिसांच्या तपासात हे दोघेही सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अंबावाडी रेल्वे मार्गावर अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याविरुद्ध कस्तुरबा पोलिस स्टेशन, MHB पोलिस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत.