नाथाभाऊ पवारांची साथ सोडणार, चर्चांना उधाण; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
जळगावमध्ये दोन मातब्बर नेत्यांनी साथ सोडल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आणखी काही मातब्बर नेते पक्ष सोडणार असल्याचं बोललं जात आहे. त्यात आता एकनाथ खडसेही शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर खुद्द एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नक्की काय म्हणाले खडसे?
अजित पवार गटात जळगावातील काही नेते गेले. ज्यांना जायचं होतं ते गेले, ज्यांना जायचं नव्हतं ते आमच्या सोबत राहिले. यानंतर आता आणखी कोणी अजित पवार गटात जातील असं मला वाटत नाही. आम्ही आता शरद पवारांसोबत आहोत. ज्या चर्चा सुरू आहेत त्यांना नाही अर्थ नाही. ज्यावेळेस अजित पवार गट वेगळा झाला, त्याच वेळी ज्यांना जायचे होते ते सर्व आमदार अजित पवार गटात सामील झाले. त्यावेळी मलाही अजित पवार गटात येण्यासंदर्भात निरोप देण्यात आला होता. परंतु, त्यावेळी मी शरद पवारांसोबत राहिलो. आताही त्यांची साथ सोडणार नाही.
शरद पवार जो निर्णय घेतील, तो माझाही निर्णय असेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या चर्चांकडे लक्ष देऊ नये. पक्षाचा विस्तार कसा होईल यावर भर द्यावा. शरद पवारांचे निर्देशच अंतिम असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Sanjay Gaikwad News: राखी सावंतला गोळ्या घालायला हव्यात”; संजय गायकवाडांचा संतप्त आरोप
शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील या मातब्बर नेत्यांसह समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आणखी काही नेते जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.